Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

PM MODI : पंतप्रधान मोदींचे ‘ते’ दूत कोण ? ज्यांनी इस्रायलमध्ये जाऊन रमजानच्या महिन्यात गाझावरील बॉम्बफेक थांबवली

8

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये रमजानच्या महिन्यात इस्रायलने गाझावर बॉम्ब हल्ले करू नये असे आवाहन केले होते. याबाबतचा खुलासा केला मोदी यांनी मुलाखतीत केला आहे. तसेच हा निरोप पोहोचवण्यासाठी एका दुताची नेमणूक करण्यात आली होती. असे मोदी यांनी मुलाखतीत सांगितले.दरम्यान, मोदींच्या या मुलाखतीनंतर ते दूत कोण होते ? याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने आज ( १७ मे ) याबाबतची माहिती दिली असून पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना शांतता चर्चेसाठी इस्रायलला पाठवले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
कोविशिल्ड’ पाठोपाठ ‘कोवॅक्सिन’ लसीने वाढवली चिंता; बनारस हिंदू विद्यापीठाचा अहवाल आला समोर…

अजित डोवाल कोण आहेत ?

अजित डोवाल हे पंतप्रधान मोदींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. १९४५ मध्ये उत्तराखंड राज्यात त्यांचा जन्म झाला. १९६८ मध्ये अजित डोवाल यांनी आयपीएस अधिकारी म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. दहशतवाद्यांकडून १९७१ ते १९९९ दरम्यान इंडियन एअरलाइन्सचे १५ वेळा विमाने हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळेस अजित डोवाल यांनी अत्यंत हुशारीने परिस्थिती हाताळली होती. तसेच सप्टेंबर २०१६ चे सर्जिकल स्ट्राइक आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राइक हे अजित डोवाल यांच्या देखरेखीखाली पार पडले. अजित डोवाल यांना विविध नामांकित पुरस्कारांसह भारतीय लष्कराच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘किर्ती चक्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Swati Maliwal Case : स्वाती मालीवाल हल्ला प्रकरण, विभव कुमार यांना राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, १७ तारखेला हजर राहण्याचे आदेश

केंद्रसरकारकडून डोवाल यांना कॅबिनेट दर्जा

२०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रसरकारने अजित डोवाल यांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाचा कार्यकाळ वाढवून त्यांना कॅबिनेट दर्जा दिला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.