Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस
- ७० हजार ९०३ हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा जबरदस्त तडाखा
- जिल्ह्यातील ३२२ गावांमधील ९७ हजार ६३४ शेतकरी बाधित
सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला. अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली, तर सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके आजही पाण्यात आहेत. तर काही शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. जिल्ह्यातील जी ३२२ गावे मुसळधार पावसामुळे बाधित झाली त्यामध्ये बार्शी १३७, माढा ३७, मोहोळ ४८, अक्कलकोट १२, दक्षिण सोलापूर ४७ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ४१ गावांचा समावेश आहे.
यामध्ये सुमारे १६ हजार १७८ हेक्टर बागायती क्षेत्राला तसंच ५१ हजार १९०.२ हेक्टर जिरायत क्षेत्राला जबरदस्त झटका बसला आहे. तसंच सुमारे ३ हजार ५३५ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना नुकसानीचा फटका बसला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील ४१ गावांमधील २३ हजार ४७३ शेतकरी बाधित झाले असून त्यांचे ६ हजार ७७५ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात ४७ गावांमधील ५ हजार ६०१ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांचे ३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. अक्कलकोट तालुक्यातील १२ बाधित गावांमधील ७३० शेतकऱ्यांना त्यांच्या ५९४ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. मोहोळ तालुक्यातील ४८ गावे बाधित असून १० हजार ५८२ शेतकऱ्यांना १२ हजार १०३.२ हेक्टर शेतीला फटका बसला आहे. तर माढा तालुक्यात ३७ शेतकरी बाधित आहेत. १२९४ शेतकऱ्यांना २ हजार ९०७ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. तसंच बार्शी तालुक्यात १३७ गावांमधील ५५ हजार ९५४ शेतकऱ्यांना त्यांच्या ४४ हजार ७६३ हेक्टर क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालं आहे.
एकूणच सोलापूर जिल्ह्यातील ३२२ गावांमधील ९७ हजार ६३४ बाधित शेतकऱ्यांचे सुमारे ७० हजार ९०३.२ हेक्टर क्षेत्रावरील शेतीला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे.