Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
शेअर मार्केटचे नावावर ३१,३५०००/- रुपये ऑनलाईन फसवणुक करणारे दहा आरोपींना अमरावती ग्रामीन पोलिसांना घेतले ताब्यात…
परतवाडा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस स्टेशन परतवाडा येथे फिर्यादी आशिष महादेवराव बोबडे वय ४४ वर्ष रा. घामोडिया प्लॉट, परतवाडा ता. परतवाडा जि. अमरावती यांनी तक्रार दिली की त्यांनी Fourth indian stock market Analysis and Learning नावाचे शेअर मार्केट व्हॉटसअॅप ग्रुप जॉईन केला. सदर गृपवर आलेल्या लिंकवर क्लिक करुन फिर्यादी यांनी त्यावर युझर आयडी व पासवर्ड बनविला व वेबसाईट लिंक द्वारे फिर्यादी यांनी एकुण ३१,३५,०००/- रु चे शेअर खरेदी केले. त्यानंतर फिर्यादी यांना पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता सदर वेबसाईट बंद दिसुन आली तसेच सदर व्हॉटसअॅप गृपमधील मोबाईल क्र. वर कॉल केला असता ते बंद असल्याने आपली फसवणुक झाल्याचे फिर्यादी यांचे लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन परतवाडा येथे दिलेल्या तक्रारीवरुन अपराध क्र.१४५/२०२४ कलम ४१७, ४२०, ४७३ भा. द.वी. सहकलम ६६ (ड) माहीती तंत्रज्ञान कायदा २००० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. सायबर चे पोलिस निरिक्षक धिरेंद्रसिंग बिलवाल, स्था.गु.शा. पो.नि. किरण वानखडे, स.पो.नी. मनीष दुबे, स.पो.नि.किरण औटी म.स.पो.नि. निर्मला भोई,सफौ. सुनील बनसोड, पो.हवा. पंकज गोलाईतकर, पोहवा प्रविण वानखडे,नापोशि सागर धापड, रितेश गोस्वामी, रितेश वानखडे पोशि गौरव गनथडे, संदीप जुगणाके, चैतन्न गुल्हाणे, रोशन लकडे, पवण ढोके, किशोर धामंदे, मपोशि प्रिया मुंडेकर व सायबर टीमने फसवणूक करणाऱ्यांच्या तांत्रिक बाबींचे विश्लेशन केले असता असे
लक्षात आले कि, आरोपी वेगवेगळे मोबाईल वापरत असुन कॉलव्दारे आप-आपसात संपर्क करुन तपास यंत्रणेची दिशाभुल करण्यासाठी वेगवेगळ्या बँकखात्यामध्ये पैसे पाठविले जात आहे सदर बँक खात्यांची साखळी जोडुन आरोपीने विविध बँक खात्यामध्ये पैसे पाठविल्याचे तपशीलांचे माहीती घेवून राज्य छत्तीसगड येथुन १) संजय शामलाल टंडन वय २५ रा. जांजगिर जि. चंपा राज्य छत्तीसगढ २) अनिलकुमार जमनालाल कटकवाल वय- २६ रा. मालकुर्द जि. सक्ती राज्य छत्तीसगढ ३) सुनिलदत्त कार्तिक राम सतरंज वय २५ रा. बडै राबेली माखरोदा जि. सक्ती राज्य छत्तीसगढ़ ४) मनोजकुमार श्रीराम चंद्रा वय 36 जि. सारगड राज्य छत्तीसगढ येथुन ४ आरोपींना अटक करण्यात आली होती
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या सखोल चौकशी दरम्यान आणखी काही सुगावा मिळाल्याने उर्वरित आरोपींना पकडणे करीता दि.१०/०५/२०२४ रोजी पोलिस पथक छत्तीसगढ राज्य येथे रवाना होवुन आरोपी १) रितेश अरुणकुमार अजगले वय २४ वर्ष धंदा मजूरी रा. ठठारी, जि. सक्ती, २) मायकल खेमलाल साहू वय
२४ वर्ष धंदा मोबाईल शॉप दुकान रा. जैजैपुर जि. सक्ती, ३) रवींद्र राजेंद्र यादव वय २९ वर्ष रा. बसंतपूर,जि.राजनांदगाव, ४) अमन हरपाल पिता महादेव हरपाल वय ३८ वर्ष रा. कातुल बोर्ड, जि. दुर्ग
५) शैलेंद्रसिंग नारायणसिंग चव्हाण वय ३५ वर्ष रा. जुना बस स्टॉप, भरकापारा, जि. राजनांदगाव ६) दिगंत शशिकांत अवस्थी वय ३८ वर्ष रा. बनभेडी ABIS अपार्टमेंट जि. राजनांदगाव दि.१४/०५/२०२४
रोजी येथुन ६ आरोपींना व यापूर्व ४ आरोपी असे एकुण १० आरोपींना अटक करण्यास अमरावती पोलिसांना यश आले
तद्नंतर गुन्हयातील तपासात आरोपींने वापरलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ७० लाख रुपये रक्कम गोठविण्यात
आली तसेच आरोपी यांनी आभासी चलन (Virtual Currency ) मध्ये देवाण – घेवाण केल्याचे तपासात पुढे आले
आहे. विशेष म्हणजे यातील अटक आरोपी हे विविध लोकांचे कॉर्पोरेट बँक खाते उघडून ते बेकायदेशीर रित्या
विविध आर्थिक फसवणुक करणेकरीता वापरण्यात आलेले आहेत. तसेच सदर आरोपी कडुन IDFC बँकेचे ३
स्टॅम्प, प्रॉपटायटर स्टॅम्प् – ३, गाव ठेलकाडीह ग्रामपंचायत सरपंच यांचे नावाचे स्टॅम्प, HDFC BANK,
AXIS BANK, ESAF BANK चे एकुण १७ DEBIT CARD, व HDFC, ICICI, SBI, RBC, INDUSINDE, ESAF, IDFC
असे वेगवेगळया बँकेचे एकुण ७४ चेक, २१ मोबाईल, १ लॅपटॉप, विविध कंपनीचे २५ सिमकार्ड वेगवेगळया बँकेचे ६०
पासबुक व एकुण १,०२,०००/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
गुन्हयामध्ये आणखी माहीती मिळविण्याची व आरोपी अटकेची तजविज ठेवण्यात आली आहे.
नागरीकांना मा. पोलीस अधीक्षक यांचे तर्फे आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनोळखी फोन कॉलवर विश्वास ठेवु नये. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लीक करु नये. तसेच शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुकी करीता अज्ञात व्यकतीचा कॉल आल्यास खात्री करुन घ्यावी, पैस गुंतवणुक करीता अनोळखी अॅप वापरु नये.आपल्या बॅंक खात्याची, एटीएम / क्रेडिट कार्डची माहिती, अज्ञात मोबाईल धारकला देवू नये. तसेच आपली फसवणुक झाल्यास तात्काळ हेल्पलाईन नंबर १९३० वर कॉल करावा व सायबर पोलीस स्टेशन, अमरावती ग्रामीण येथे संपर्क साधावा.