Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Vivo भागवणार स्वस्तात मोठ्या डिस्प्लेची हौस! 12GB RAM आणि 10000mAh बॅटरीसह टॅब्लेट करणार लाँच

8

Vivo त्याच्या स्मार्टफोन आणि टॅबच्या पोर्टफोलिओमध्ये झपाट्याने वाढ करत आहे. एका रिपोर्टनुसार, Vivo आता Vivo Pad 3 वर काम करत आहे. असे म्हटले जात आहे की या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या Vivo Pad 3 Proचे हे परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेले मॉडेल असेल.. अधिकृतपणे या डिव्हाइसबद्दल जास्त माहिती समोर आली नसली तरी, एका टिपस्टरने याबद्दलचे डिटेल्स ऑनलाइन लीक केले आहेत. जर तुम्ही पण परवडणारा टॅबलेट घेण्याचा विचार करत असाल तर बघा तुम्हाला त्यात कोणते खास फीचर्स मिळतील…

Vivo Pad 3 मध्ये काय खास असेल यावर एक नजर टाकूया:

मोठा डिस्प्ले आणि हाय रिफ्रेश रेट

असे म्हटले जात आहे की Vivo Pad 3 मध्ये मोठा 12.1 इंच LCD डिस्प्ले असेल, जो 2800×1968 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. विशेष गोष्ट अशी आहे की डिस्प्लेमध्ये 144 Hz रिफ्रेश रेट देण्यात येईल, गेम खेळताना किंवा कोणतेही कंटेंट पाहताना यूजर्सना उत्तम अनुभव देईल

प्रोसेसर आणि बॅटरी देखील दमदार

या टॅबमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आहे. ही Qualcommची नवीन सब-फ्लॅगशिप चिप आहे, त्यामुळे तुमची रोजची कामे तसेच गेमिंसाठी हा डिवाइस बेस्ट चॉइस ठरेल. टॅब 10000mAh ची मोठी बॅटरी पॅक देण्यात येईल, याचा अर्थ वारंवार चार्जिंग करण्याचा त्रास यूजर्सना होणार नाही.

फोटोग्राफीसाठी बेसीक कॅमेरा

आता हा परवडणारा टॅब्लेट असल्याने फोटो आणि व्हिडीओसाठी यात बेसिक कॅमेरा सेटअप असेल. असे बोलले जात आहे की सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा असेल, तर मागील बाजूस 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात येईल.

हेवी रॅम आणि अधिक स्टोरेज

सिक्युरिटी म्हणून, यात 2D फेशियल रेकग्निशन सपोर्ट असेल. टिपस्टरने असेही म्हटले आहे की हा टॅब्लेट 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येईल. शिवाय, ते इतर कॉन्फिगरेशनमध्ये देखील लॉन्च केले जाईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.