Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- लखीमपूर खेरी हिंसाचाराचे देशभरात तीव्र पडसाद
- विरोधी पक्षाच्या नेत्यांवरील कारवाईचा निषेध
- महाराष्ट्र काँग्रेस करणार राज्यभर निषेध आंदोलन
वाचा: शेतकऱ्यांना चिरडणं हे मोदींचं धोरण आहे का?; असले प्रकार ब्रिटिश राजवटीत व्हायचे’
लखीमपूर खेरी येथील घटना व त्यानंतरच्या घडामोडींवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालीबानी राज आहे. मोदी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असलेल्या अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतकऱ्यांना चिरडले. मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी अजयसिंह बिष्ट (योगी आदित्यनाथ) यांचे सरकार आटापिटा करत आहे. याउलट पीडित शेतकरी कुटुंबीयांना भेटून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जाणाऱ्या प्रियंका गांधी, खासदार दीपेंदर हुड्डा व काँग्रेस कार्यकत्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं. उत्तर प्रदेशात लोकशाहीचा गळा घोटला जात असून शेतकरी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय व अत्याचार केले जात आहेत,’ असा आरोप पटोले यांनी केला.
वाचा: ‘संजय राऊत हे कागदावरचे लीडर, त्यांना काय उत्तर द्यायचं’
‘उत्तर प्रदेशातील भाजपच्या अत्याचारी राजवटीला तेथील जनता कंटाळली आहे. या अत्याचारी सरकारला जनता धडा शिकवेल. काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रियंका गांधी यांना पीडित कुटुंबीयांना भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं पटोले म्हणाले. लखीमपूर खेरी येथील शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेस राज्यभर आज आंदोलन करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.