Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Poco चा पहिला टॅबलेट या दिवशी होईल लाँच, तारीख ठरली

11

Poco कंपनीनं अलीकडेच एक नवीन लाँच इव्हेंटची घोषणा केली आहे. या इव्हेंटमधून कंपनी आपली नवीन Poco F6 सीरीज लाँच करणार आहे. या सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन Poco F6 आणि Poco F6 Pro चा समावेश केला जाईल. स्मार्टफोन सोबतच आता कंपनीनं एक नवीन डिवाइस टीज करण्यास सुरुवात केली आहे. हा आहे पोकोचा टॅबलेट. पोको टॅबलेटची माहिती गेले अनेक दिवस लीक्सच्या माध्यमातून समोर येत होती. आता कंपनीनं हा टॅब ऑफिशियली टीज करण्यास सुरुवात केली आहे. चला जाणून घेऊया कधी लाँच होईल पोकाचा पहिला टॅबलेट.

Poco India नं आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर Poco F6 सीरीज डेडिकेटेड मायक्रोसाइट लाइव्ह केली आहे. या साइटच्या माध्यमातून स्मार्टफोनची लाँच डेट सांगितली आहे. हे फोन भारतात 23 मेला लाँच होतील. हे फोन 23 मे संध्याकाळी 4.30 वाजता भारतात लाँच होतील. परंतु ग्लोबल साइटवर या फोनसह Poco Pad देखील टीज करण्यात आला आहे.
Poco चा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय भारतात; इतकी असू शकते किंमत

सध्या कंपनीनं Poco Pad ची लाँच डेट कंफर्म केली नाही. परंतु हा Poco F6 सीरीज मायक्रोसाइटवर टीज करण्यात आला आहे, त्यामुळे अंदाज लावला जात आहे की हा टॅब देखील 23 मेला येऊ शकतो. या टॅब बद्दल कंपनीनं माहिती दिली आहे की हा टॅब मोठ्या डिस्प्लेसह सादर केला जाईल. तसेच, या टॅब संबंधित इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.

Poco Pad leak Specs

वर सांगितल्याप्रमाणे Poco Pad ची माहिती लीक्स मधून समोर येत आहे. त्यामुळे लीकच्या माध्यमातून याचे अनेक फीचर्स ऑनलाइन समोर आले आहेत. लीकनुसार, हा टॅब 12.1 इंचाच्या मोठ्या IPS डिस्प्लेसह बाजारात येईल. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तसेच या टॅब मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी यात 8MP चा रियर कॅमेरा दिला जाईल. तसेच, सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी पण 8MP चा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. टॅबची बॅटरी 10,000mAh ची असेल, त्याचबरोबर 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.