Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएसला केंद्रीय एजन्सीकडून याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर एटीएसकडून विमानतळावर कसून झडती घेण्यात आली. यादरम्यान एक संशयित दिसला आणि त्याची कसून चौकशी केली असता चार जणांची नावे समोर आली. अटक करण्यात आलेले चारही लोक इसिसशी संबंधित असून ते या दहशतवादी संघटनेत दीर्घकाळ सक्रिय होते. ते मूळचे श्रीलंकेचे नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांचा गुजरात किंवा अन्य राज्यात काही संबंध आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.
या प्रकरणी गुजरातचे डीजीपी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देणार आहेत. चेन्नईहून अहमदाबादला पोहोचल्यानंतर हे चारही दहशतवादी पाकिस्तानी हँडलरच्या संदेशाची वाट पाहत होते. त्यांना अहमदाबादहून टार्गेट लोकेशन गाठायचे होते. ते येथे शस्त्रे आणणार होते. त्याआधीच एटीएसने सर्वांना अटक केली. दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २१ आणि २२ मे रोजी आयपीएलचे दोन सामने होणार आहेत. आज अहमदाबाद विमानतळावरून चार दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत. विमानतळ सध्या हाय अलर्टवर आहे. काही वेळापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या गुजरातमधील जागांसाठी मतदानापूर्वी १६ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मेलमध्ये आली होती. त्यावेळी पोलिसांनी शाळेची सुरक्षा वाढवून चोख तपासणी केली होती.