Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
HMD Pulse+ Business Edition ची किंमत
सध्या हा खास फोन युरोपियन बाजारात आला आहे. तिथे HMD Pulse+ Business Edition ची किंमत 199 युरो ठेवण्यात आली आहे, ही किंमत 18,033 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. HMD Pulse+ Business Edition अप्रिकॉट क्रश कलरमध्ये खरेदी करता येईल. तसेच ग्लेशियर ग्रीन आणि मिडनाइट ब्लू कलर देखील आहेत. हा फोन जागतिक बाजारात येईल की नाही हे अद्याप सांगता येत नाही.
HMD Pulse+ Business Edition चे स्पेसिफिकेशन्स
HMD Pulse+ Business Edition मध्ये तसे पाहता अनेक फीचर्स आहेत परंतु फर्मवेयर-ओव्हर-द-एयर (FOTA) सर्व्हिस सर्वात खास आहे. याच्या मदतीनं बिजनेस युजर्स अनेक डिवाइसेजवर इंस्टॉल्ड अॅप्स मॅनेज आणि अपडेट करू शकतात.
या फोनसह कंपनीनं रिपेयरबेल सॉल्यूशन देखील आणले आहेत, म्हणजे फोनचे स्पेयर पार्ट्स बदलता येतील. कंपनीनं यासाठी आयफिक्सिटसह पार्टनरशिप केली आहे. फोनमध्ये मोठा इश्यू आल्यास कंपनी डोर-टु-डोर केयर सर्व्हिस देत आहे.
फोनमध्ये 6.56 इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. Pulse+ Business Edition मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. मुख्य कॅमेरा 50 एमपीचा सेन्सर आहे. तर सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी आहे. विशेष म्हणजे ही बॅटरी युजर घरबसल्या बदलू शकतात.
कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससाठी फोनमध्ये NFC, WiFi, ब्लूटूथ 5.0 ची सुविधा आहे. एक USB Type-C 2.0 पोर्ट आहे. नवीन एचएमडी फोनमध्ये युनिसोक T606 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टाेरेज देण्यात आली आहे. फोनचे वजन 187 ग्राम आहे.