Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Bell 212 हेलिकॉप्टर
एक रिपोर्टनुसार, Bell 212 दोन ब्लेड असलेला एक मध्यम आकाराचा हेलिकॉप्टर आहे. याची निर्मिती बेल हेलीकॉप्टरनं केली आहे, जी एक अमेरिकन कंपनीनं केली आहे. 1968 मध्ये पहिल्यांदा Bell 212 बाजारात आला होता. हा हेलिकॉप्टर नागरिकांचा विचार करून बनवण्यात आला होता. परंतु सरकार आणि खाजगी ऑपरेटर्स देखील या हेलिकॉप्टरचा वापर करतात.
जेव्हा हा हेलिकॉप्टर बनवण्यात आला होता तेव्हा याची कपॅसिटी 15 लोकांची होती, ज्यात एक पायलट आणि 14 प्रवाश्यांची सोया करण्यात आली होती. 1968 मध्ये पहिल्या फ्लाईट नंतर Bell 212 हेलिकॉप्टर 1971 मध्ये अमेरिका आणि कॅनडानं आपल्या ताफ्यात याचा समावेश केला.
हेलिकॉप्टरचे आतापर्यंत अनेक व्हेरिएंट्स आले आहेत. यात Bell मॉडेल 212 चा समावेश आहे. तसेच ट्विन टू ब्लेड, अगस्ता-बेल एबी 212, अगस्ता-बेल AB.212ASW, बेल मॉडेल 412 आणि ईगल सिंगलचा देखील समावेश करण्यात आला आहे.
Bell 212 Specifications
Bell 212 ची क्षमता 14 पॅसेंजर्सची आहे. याची लांबी 17.4163 मीटर आणि उंची 3.8311 मीटर आहे. रिकाम्या हेलिकॉप्टरचे वजन 2,962 किलो आहे, तर हा 5,080 किलो मॅक्सिमम लोड वाहू शकतो. याचा स्पीड ताशी 190 किलोमीटर इतका आहे, तर तर रेंज 439 किलोमीटर आहे.
Bell 212 चा वापर
Bell 212 एक मल्टीपर्पज हेलिकॉप्टर आहे. प्रवाश्यांची ने-आण करण्यासाठी याचा वापर केला जातो. ताईच हा हेलिकॉप्टर माल वाहण्यासाठी, हत्यारांचा पुरवठा करण्यासाठी केला जाऊ शकतो. आग विझवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.
मीडिया रिपोर्टनुसार, इराणी राष्ट्रपती ज्या Bell 212 मध्ये प्रवास करत होते तो मॉडिफाइड करण्यात आला होता, त्यामुळे सरकारचे उच्च अधिकारी, नेते त्यात प्रवास करू शकले. Bell 212 सीरीजमधील सर्वात अॅडव्हान्स हेलिकॉप्टर आहे बेल 412. त्या हेलिकॉप्टरमधून सैनिकांची ने-आण, मेडिकल ट्रान्सपोर्टेशन करता येईल.
आधी देखील झाला होता अपघात
Bell 212 हेलिकॉप्टर याआधी देखील अपघातग्रस्त झाला आहे. 14 सप्टेंबर 1982 रोजी, मेडिकल इमर्जन्सीमुळे उड्डाण केलेला हेलिकॉप्टर पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे उत्तर समुद्रात क्रॅश झाला होता. या दुर्घटनेत सर्व 6 क्रू मेंबर्सचा जीव गेला होता.