Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Arvind Kejriwal : गुजरात, दिल्ली, पंजाबमधील लोक पाकिस्तानी आहेत का ? अमित शहांच्या वक्तव्यावर केजरीवाल कडाडले
अमित शहांचं वक्तव्य काय होतं?
अमित शहांनी सोमवार (२०मे) रोजी दिल्लीत सभा घेतली. या सभेत शहा यांनी आम आदमी पक्षाला समर्थन करणारे पाकिस्तानी असल्याचं म्हणत आप वर टीका केली. अमित शहांच्या याच टिकेला केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देशातील जनता पाकिस्तानी आहे का ?
केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत अमित शहांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” अमित शहा यांनी आपल्या सभेतून देशातील जनतेला शिवीगाळ केली आहे. आम आदमी पार्टीचे समर्थक पाकिस्तानी असल्याचे ते म्हणाले. दिल्लीतील ७० जागांपैकी ६२, पंजाबमधील ११७ जागांपैकी ९२, गुजरातमध्ये १४ टक्के मतदान झाले. गोवा, यूपी, आसाममध्ये आम आदमी पक्षाला मते मिळाली. या राज्यांमधील जनतेने आम्हाला मत दिली ती जनता पाकिस्तानी आहे का? असा प्रश्न केजरीवाल यांनी अमित शहा यांना विचारला आहे.
देशात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार येणार
अरविंद केजरीवाल यांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ”देशात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार येणार आहे. अनेक सर्वेक्षण करण्यात आले आहेत. त्यातून ‘इंडिया’ आघाडीला स्वबळावर ३०० हून अधिक जागा मिळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशात स्वच्छ आणि कायमस्वरूपी टिकणारे सरकार स्थापन होईल.काल अमित शहा यांनी दिल्लीत येऊन सभा घेतली. त्यांच्या सभेसाठी ५०० पेक्षा कमी लोक उपस्थित होते. यातून लोकांची भाजपवरील नाराजी दिसून येत आहे.”