Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Android 15 यूजर्सना OTP स्कॅम्सपासून मिळेल मुक्ती, Googleने लाँच केले नवीन फिचर

10

Google ने Android 15 ची नवीन बीटा व्हर्जन लॉन्च केले आहे. येत्या काही महिन्यांत युजर्सला Android 15चे हे व्हर्जन वापरता येणार आहे. Google ने Android 15 च्या बीटा व्हर्जनमध्ये अनेक फिचर्स लाईव्ह केले आहेत. OTP फसवणुकीपासून लोकांचे प्रोटेक्शन करण्यासाठी एक नवीन फिचर जोडण्यात आले आहे.

Google I/O च्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये, कंपनीने सांगितले की Android 15 फसवणूक आणि घोटाळे टाळण्यासाठी चांगले प्रोटेक्शन प्रदान करेल. कंपनीने म्हटले आहे की हे एआय पॉवर्ड प्रोटेक्शन असतील, ज्याचा वापर करून फसवणूक आणि घोटाळे टाळता येतील.

Android 15 मध्ये ऍडीशनल सिक्युरिटी उपलब्ध असेल

चांगल्या सिक्युरिटीसाठी, अनेक ॲप्सना नोटिफिकेशनमधील OTP मध्ये प्रवेश मिळणार नाही. तुम्ही वियरेबल कँपेनियन ॲप्स वापरत असल्यास, त्यांना Android 15 मध्ये OTP मध्ये प्रवेश मिळणार नाही. यामुळे, स्पायवेअरला ओटीपीच्या माध्यमातून एंट्री मिळणार नाही. याचा अर्थ नवीन Androidमध्ये मालवेअरला OTPचा वापर करून सिस्टिममध्ये एंट्री मिळणार नाही.

सेंसिटिव परमिशनचा बचाव करण्यासाठी Android 15 मध्ये रिस्ट्रिक्शन वाढवले जातील. फसवणूक करणारे अशा परमिशनचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करतात. हे फिचर प्रथम Android 13 मध्ये लॉन्च केले गेले होते.

ऍडीशनल परमिशन्स द्याव्या लागतील

Android 15च्या युजर्सना एडिशनल परमिशन्स द्याव्या लागतील, त्यानंतर कोणत्याही ॲपला या परमिशन्स मिळतील. प्रामुख्याने वेब ब्राउझर, मेसेजिंग ॲप्स आणि फाइल मॅनेजरसारख्या ॲप्सना एडिशनल परमिशन्स द्याव्या लागतील. यासोबतच अँड्रॉइड 15 मध्ये स्क्रीन शेअरिंग सिक्युरिटी संदर्भात देखील सुधार करण्यात आला आहे.

Android 15 स्क्रिन शेअरिंग सुरु केल्यानंतर प्रायव्हेट कंटेंट दिसणार नाही. यामुळे तुमचा डेटा इतरांच्या नजरांपासून प्रायव्हेट राहिल. त्यात तुमचे OTPसारखे महत्त्वाचे मेसेजेस दिसणार नाहीत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.