Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५ हजार ३८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण २६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या २६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ८६ हजार ०५९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३१ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘…अन्यथा महाराष्ट्र बंद करू’; काँग्रेस नेते नाना पटोले यांचा भाजपला इशारा
सक्रिय रुग्णसंख्येचा ग्राफ येतोय खाली
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार ६३७ इतकी आहे. काल ही संख्या ३५ हजार ८८८ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ८ हजार ८३९ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ८४८ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार १६२ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या १ हजार ९०६ वर आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ११६ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ९९२ आहे.
क्लिक करा आणि वाचा- राज्यात ‘असा’ साजरा होणार नवरात्रौत्सव; राज्य सरकारने केल्या नव्या गाइडलाइन जारी
मुंबईत उपचार घेत आहेत ६,१९८ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ६ हजार १९८ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६०० इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७११, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८४७ इतकी खाली आली आहे.
गोंदियात १ सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४७८, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९९ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १०७ वर आली आहे. तर गोंदियात राज्यात सर्वात कमी १ सक्रिय रुग्ण आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद; केल्या महत्वाच्या सूचना
२,४०,०८८ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९३ लाख ३७ हजार ७१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६२ हजार ५१४ (११.०६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४० हजार ०८८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ३५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.