Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१२वीत शंभर टक्के गुण मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी; तनिष्काने राज्यात कसा मिळवला प्रथम क्रमांक

11

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या वर्ष म्हणून बारावीच्या वर्षाकडे बघितले जातात. यामुळे या वर्षांमध्ये विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात आणि सर्वाधिक मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. आज राज्यातील १२वीचा निकाल जाहीर झाला. यात छत्रपती संभाजीनगरच्या तनिष्का बोरामणीकरने शंभर पैकी शंभर टक्के मिळवले. तनिष्काने १२वीमध्ये शंभर टक्के गुण मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी होण्याचा मान मिळवलाआहे. तनिष्का सागर बोरामणीकर अस या विद्यार्थिनीची नाव आहे.तनिष्का सागर बोरामणीकर असे शंभर पैकी शंभर गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तनिषा शहरातील देवगिरी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. तनिष्काला लहानपणापासूनच बुद्धिबळ खेळण्याची आवड होती. यामुळे ती शालेय शिक्षणापासूनच बुद्धिबळ स्पर्धा खेळत होती. तिने आतापर्यंत अनेक बुद्धिबळ स्पर्धा भाग आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा समावेश आहे. या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये देखील स्वतःचा अस्तित्व निर्माण केले आहे.

तनिष्काला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पाली व अर्थशास्त्र या विषयांमध्ये शंभर पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयात ९५, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पाली व अर्थशास्त्र विषयात शंभर पैकी १०० गुण मिळाले आहेत. इंग्रजी विषयात ८९ गुण, सेक्रेटरी प्रॉपर्टीज ९८ असे एकूण 582 गुण मिळाले. तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये तिला १८ गुण होते यामुळे तिथे एकूण गुण ६०० झाले .

तनिष्का लहानपणापासूनच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभागी होत होती. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भाग घेतला आहे. बारावीमध्ये असताना दडपण होते, तिला सुरुवातीला फारसा वेळ दिला नाही. मात्र शेवटचा दीड महिना राहिला असताना तिने अभ्यासाकडे लक्ष दिले आणि काळजीपूर्वक अभ्यास केला. एक वेळा अभ्यास करायला बसले की पूर्ण अभ्यास होईपर्यंत ती उठत नसे. सातत्य ठेवून अभ्यास केल्यामुळे हे यश मिळाल्या तनिष्काने सांगितले. शंभर पैकी शंभर गुण मिळाल्यामुळे खूप आनंद होतो आणि याचा श्रेय आई रेणुका व वडील सागर यांचा असल्याचे तिने सांगितले.

तनिष्का लहानपणापासूनच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभागी होते. तसेच अभ्यासामध्ये देखील लक्ष देते. बारावीमध्ये चांगले मार्क मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र शंभर पैकी शंभर टक्के मिळतील अशी अपेक्षा नव्हती. मुलीला शंभर पैकी शंभर गुण मिळाल्याचा अभिमान वाटतो, असे आई रेणुका बोरामणीकर या म्हणाल्या.

आमची तनिष्का लहानपणापासूनच अभ्यासामध्ये व खेळामध्ये हुशार आहे. तनिष्काला अभ्यास व तिच्या बुद्धिबळ स्पर्धेबाबत कुठलीच आठवण करून द्यावी लागत नाही. तिचे काम जबाबदारीने पार पडते. आज तनिष्काला बारावीमध्ये शंभर पैकी शंभर टक्के मिळाल्याचा आनंद आहे असे तिचे वडील सागर बोरामणीकर म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.