Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘अच्छे दिन आयेंगे, मोदीजी जायेंगे’, केजरीवालांची नवी घोषणा, दिल्लीत प्रचाराला रंग

8

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला सत्तेवर बसविणारे दिल्ली आणि पंजाबचे लोक तसेच आपला वाढता पाठिंबा देणारे गोवा, गुजरातचे लोक पाकिस्तानी आहेत काय? असा उपरोधिक सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांना विचारला. ‘अच्छे दिन आयेंगे, मोदीजी जायेंगे’, अशी नवी घोषणा आप दिल्लीत देत आहे.

केजरीवाल म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने आम्हाला ६२ जागा देऊन आमचे सरकार बनवले आहे आणि पंजाबच्या जनतेने आम्हाला ११७ पैकी ९२ जागा दिल्या आहेत. या राज्यांतील लोक पाकिस्तानी आहेत का? मोदींनी शहा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली याचा शाह इतका गर्व वाटू लागला की त्यांनी लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपमधील त्यांच्या खऱ्या शत्रूंशी लढण्याऐवजी मलाच का शिव्या देत आहेत? असाही सवाल त्यांनी विचारला.
पीएला अटक, अरविंद केजरीवाल आक्रमक, आपच्या नेत्यांना घेऊन भाजप कार्यालयात जाणार!

केजरीवालांवर हल्ल्याचा कट

दिल्ली मेट्रोच्या राजीव चौक, पटेल चौक आणि पटेल नगर मेट्रो स्थानकांवर केजरीवाल यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारी पोस्टर लावल्याचा आरोप आपने केला. खासदार संजय सिंह म्हणाले की अंकित गोयल नावाच्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची जी धमकी दिली तिची भाषा भाजपची आहे.
SWATI MALIWAL : स्वाती मालीवाल प्रकरण; अखेर विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांकडून अटक

‘जेल का जवाब वोट से’

दरम्यान केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या सातही लोकसभा मतदारसंघांत मंगळवारपासून ‘जेल का जवाब वोट से’ ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली. दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय म्हणाल्या की देशात सुरू असलेल्या भाजपच्या हुकूमशाहीला प्रत्युत्तर देण्यासाठी जनता सज्ज झाली आहे.
Swati Maliwal : दोषी आढळल्यास केजरीवालांवर कारवाई केली जाईल; राष्ट्रीय महिला आयोगाचा इशारा

विभवला मुंबईत आणणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणातील आरोपी बिभव कुमारला चौकशीसाठी दिल्ली पोलीस मुंबईला घेऊन जाणार आहेत. बिभव याने मुंबईत आपला मोबाईल फॉरमॅट केल्याचा पोलिसांना संशय आहे. बिभव मुंबईत कोणाला भेटला याचाही तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना बिभव कुमारच्या मोबाईलवरून मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

मालीवाल यांची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न- भाजप

राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यावर आपकडून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप भाजपने केला. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की कोणत्याही राजकीय व सरकारी पदावर नसलेला विभव कुमार कोणत्या अधिकारात मुख्यमंत्री निवासस्थानी राहत होता. आपमध्ये फक्त १०-११ खासदार आहेत आणि तुम्ही सर्वांना केजरीवाल चांगले ओळखतात. मग पक्षाच्या खासदाराला त्यांची अपॉइंटमेंट घेण्याची गरज काय आहे? असाही सवाल त्यांनी केला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.