Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

३७ वर्ष संघापासून दूर राहिलो, माझ्या प्रगतीसाठी कधीच संघाचा वापर केला नाही : चित्तरंजन दास

8

कोलकत्ता – उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी ३७ वर्षाच्या न्यायालयीन कामकाजातून सेवानिवृत्ती घेतलीय. सोमवारी चित्तरंजन दास यांनी उच्च न्यायालयाचे सदस्य आणि बारच्या सदस्यांसमोर स्नेहसमारोपाच्या कार्यक्रमात आपण आरएसएसचे कार्यकर्ते आहोत असे जाहीर केले. तसेच आरएसएसने संधी दिली तर संघासाठी पूर्ण वेळ काम करेन असे विधान केलंय. ३७ वर्षापू्र्वी आपल्या न्यायालयीन नोकरीमुळे आपण आरएसएस पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता पण आता सेवानिवृत्तीनंतर मला आरएसएसने काही जबाबदारी दिली तर मी पुन्हा एकदा आरएसएस सोबत काम करेन असे त्यांनी स्पष्टच सांगितलंय.

मी चांगला माणूस असल्याने माझा वाईट संघटनेसोबत संबध नसणारच..

मी आरएसएस सोबत काम केले हे सांगण्याची माझ्याकडे हिम्मत आहे.पण मी न्यायालयीन कामकाज करताना कोणावरही अन्याय होईल असे वागलो नाही. कधीच कोणाताही पूर्वाग्रह ठेवला नाही गरीब, श्रीमंत, डावे विचारसरणीचे पक्ष किंवा काँग्रेस, तृणमूल हे सारेच मला न्यायालयीन चौकटीसमोर समान आहेत असेसुद्धा दास यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. मी चांगला माणूस आहे म्हणून मी आरएसएस सारख्या चांगल्या संघटनेसोबत सलग्न होतो आणि असणार. प्रामाणिकपणा, साहस, आणि न्यायनिष्ठ मूल्य मला आरएसएसने शिकवले मी त्यांचा ऋणी आहे असे म्हणत त्यांनी आरएसएसचे आभार मानले.
…तरच तो बलात्कार समजला जाईल, उच्च न्यायालयाचा तरुणीला झटका, मुलाविरोधातील गुन्हाही रद्द करण्याचे आदेश

मी कधीच संघाचा फायदा वैयक्तिक वापरासाठी केला नाही

ओडिशात राहणारे चित्तरंजन दास हे लहानपणा पासून ते तरुणवयापर्यंत संघाच्या शाखेत जायचे असा त्यांनी खुलासा केलाय. तसेच मी संघामुळे चांगले व्यक्तिमत्व असलेला माणूस बनलोय हे दास यांनी कबूल केलंय. देशभक्ती आणि जिथे तुम्ही काम करताय त्या कामासाठी कटीबद्ध राहणे हे गुण सघांकडून आत्मसात झालेत. यासह पदावर असताना कधीच संघाचा फायदा वैयक्तिक स्वार्थासाठी केला नाही असे दास यांनी भाषणादरम्यान म्हटले.

कोण आहेत चित्तरंजन दास?

चित्तरंजन दास यांनी १९८६ पासून वकिली सुरु केलीय.ओडिशातील न्यायालयात 1999 साली दास यांनी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून काम केलंय. २००९ साली ओडिशात त्यांना अतिरिक्त न्यायाधीशांचा पदभार सोपवण्याआधीच त्यांच्याकडे रजिस्ट्रारचा पदभार सोपवण्यात आला. २०२२ साली दास यांची कोलकत्ता हायकोर्टात बदली करण्यात आली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.