Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, 22 मे 2024 : पैसे जपून खर्च करा, या राशींना लागेल लॉटरी! वाचा आजचे राशीभविष्य

8

Aaj Che Rashi Bhavishya 22 May 2024:
बुधवार २२ मे वृषभ, कर्क आणि कन्या राशीसाठी आजचा दिवस लकी असेल. मिथुन राशीच्या लोकांनी वादविवादपासून दूर राहावे. ग्रहांच्या होणार युतीमुळे तुमचा आजचा दिवस कसा जाईल. नोकरीत प्रमोशन मिळेल का? उत्पन्नात वाढ होईल? जाणून घ्या १२ राशींचे राशीफल ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्याकडून

मेष – पैसे जपून खर्च करा

आजचा दिवस तुमच्यासाठी मिळता-जुळता असणार आहे. कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमची विचारसरणी समजून घेणे आवश्यक आहे. निर्णयांकडे लक्ष द्या. शक्य तितक्या लवकर निर्णय घ्यावे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणताही आजार असेल तर बरे होण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आर्थिक स्थितीचा सामना करावा लागेल. पैसे जपून खर्च करा. कुटुंबासोबत वेळ घालवताना काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराला वेळ द्या. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमचे विचार इतरांसोबत शेअर करावे लागतील. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल.
आज नशिब ९३ टक्के तुमच्या बाजूने असणार आहे. तुळशीला नियमतपणे जल अर्पण करुन दिवा लावा.

वृषभ – कामाच्या ठिकाणी कौतुक होईल

वृषभ - कामाच्या ठिकाणी कौतुक होईल

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला परिणाम देईल. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. कार्यशैलीने तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करावे लागेल. त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचा बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करु शकतो. तुमचे वैयक्तिक संबंध चांगले होतील. लोकांशी तुमचा संवाद वाढेल. मित्रांसोबतच्या मैत्रीचे प्रेमात रुपातंर होईल. आरोग्याची काळजी घ्याल. व्यवसायात यश मिळेल. कामाला पुढे नेण्यासाठी नवीन योजना अंमलात आणाल. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोतही वाढतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कामात सातत्य राखाल.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. लक्ष्मी देवीला खीरचा नैवेद्य दाखवा.

मिथुन – मित्रांमध्ये गैरसमज होतील

मिथुन - मित्रांमध्ये गैरसमज होतील

तुमच्यासाठी आजचा दिवस अनुकूल नसेल. कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यासोबत काहीही चुकीचे घडू शकते. मित्रांमध्ये गैरसमज निर्माण होतील. कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याकडे लक्ष द्या. आहारात संतुलन राखावे लागेल. आत्मविश्वासावर ध्यान करा. ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. योग आणि ध्यान केल्याने फायदा होईल. विचार स्पष्ट केल्याने समस्या सोडवता येतील.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्यावा.

कर्क – पैसे कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील

कर्क - पैसे कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील

आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. कामाच्या ठिकाणी उत्साहात काम करण्याची संधी मिळेल. कामात प्रचंड यश मिळेल. कामात नवीन उंची गाठण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळेल. व्यवसायात पैसे कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील. व्यवसायात नवीन योजना सुरु करण्याची संधी मिळेल. कामात नवीन गोष्टी प्रस्थापित कराल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असणार आहे. गणपतीला लाडूचा नैवेद्य दाखवा.

सिंह – कामावर लक्ष द्या

सिंह - कामावर लक्ष द्या

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. सावधगिरी बाळगावी लागेल. पैशांच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणतीही गुंतवणूक तुम्हाला नफ्यापासून दूर घेऊन जाईल. नोकरदार लोकांना त्यांच्या कामावर लक्ष द्यावे लागणार आहे. पगारवाढीसाठी कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये बदल घडतील. मालमत्तेसंबंधित प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगा. जोडीदाराला गिफ्ट द्याल. प्रेमाच्या बाबतीत नवीन अनुभव मिळतील. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. ज्यामुळे जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्यदेवला सकाळी जल अर्पण करा.

कन्या – प्रियजनांसोबत वेळ घालवाल

कन्या - प्रियजनांसोबत वेळ घालवाल

आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उताराचा असणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणी येतील. त्यामुळे तुम्हाला संयम राखावा लागेल. तुम्हाला तुमच्या विचारांवर आणि भावनांवर नेहमीपेक्षा जास्त नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रियजनांसोबत वेळ घालवाल. कामात यश मिळेल. तुमच्या कामावर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. तुम्हाला तुमच्या विश्वासार्हतेवर विश्वास ठेवावा लागेल. नवीन प्रकल्पांबद्दल विचार करावा लागेल. यश मिळवण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त काम कराल. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळू शकते.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुच्या मंदिरात पिवळ्या कापडात चण्याची डाळ आणि गुळ बांधून दान करा

तुळ – सकारात्मक राहाल

तुळ - सकारात्मक राहाल

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल. ज्यामुळे मूड चांगला होईल. तुमच्या मनात अनेक नवीन विचार येऊ शकतात. जीवनात सकारात्मक निर्णय घ्याल. कौटुंबिक समस्यांबद्दल तुम्हाला त्रास होईल. अनावश्यक काळजी करण्याऐवजी एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. नोकरदार लोक त्यांच्या कामात समर्पित राहातील. आर्थिक बाबतीत फायदा होईल. इच्छेनुसार पैसे खर्च कराल. जीवनात यशस्वी व्हाल. तुमच्या कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत राहिल्याने आनंद मिळेल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना वस्त्र किंवा अन्न दान करा.

वृश्चिक – ध्येय साध्य होईल

वृश्चिक - ध्येय साध्य होईल

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. खूप दिवसांनी जीवनात आनंद मिळेल. कामात यशस्वी व्हाल. ध्येय साध्य होईल. कामाच्या ठिकाणी उत्साहाने काम करण्याची संधी मिळेल. नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची संधी मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांनाही आज गुंतवणूक केल्यास फायदा होईल. पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस शुभ असेल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. व्यवसाय पुढे नेण्याचे मार्ग सापडतील. लव्ह बर्ड्ससाठी आजचा दिवस खास असेल.
आज भाग्य ६१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखरचा नैवेद्य अर्पण करा

धनु – कुटुंबासोबत वेळ घालवा.

धनु - कुटुंबासोबत वेळ घालवा.

आजचा दिवस तुमच्यासाठी सोपा नसणार आहे. कामात अडचणी येतील. व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. फसवणूक होऊ शकते. व्यवसाय करण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. कुटुंबासोबत वेळ घालवावा लागेल. प्रियजनांशी संवाद साधण्यासाठी वेळ काढा. घरगुती गोष्टींमध्ये सावध राहा. आरोग्याची काळजी प्रकर्षाने घ्यावी. नियमित व्यायाम करा. तुमच्या दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष द्या.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला चपाती खाऊ घाला.

मकर – विचारपूर्वक निर्णय घ्या

मकर - विचारपूर्वक निर्णय घ्या

आजचा दिवस अशुभ राहिल. अनियंत्रित घटनांना सामोरे जावे लागेल. कामात सावध राहून विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याकडेगही लक्ष द्या. निराशेचा सामना करावा लागू शकतो. कामावर लक्ष केंद्रित करा. इतरांच्या सल्ल्याला घाबरु नका. कामावर लक्ष केंद्रित करुन ते पूर्ण करण्याचे काम करा. कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळेल. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायमाचा अभ्यास करा

कुंभ – बँक बॅलेन्स वाढेल

कुंभ - बँक बॅलेन्स वाढेल

आजचा दिवस चांगला परिणाम देईल. कार्यशैलीने वरिष्ठांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल. ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. वैयक्तिक संबंध चांगले होतील. लोकांशी तुमचा संवाद वाढेल. कामावर लक्ष केंद्रित केल्याने फायदा होईल. बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. काम वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कराल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कोणतेही नवीन काम करताना काळजी घ्याल.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा.

मीन – नवीन गोष्टी कराल

मीन - नवीन गोष्टी कराल

आजचा दिवस खूप चांगला असेल. नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. नवीन गोष्टी स्वीकारण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात नवीन नातेसंबंधांसाठी आजचा काळ शुभ असेल. घरात लग्नाची चर्चा केली जाईल. ज्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंद होईल. खरेदीसाठी घराबाहेर पडाल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासावर लक्ष द्यावे. तुमचे ज्ञान इतरांसोबत शेअर करा.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवचालीसाचा जप करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.