Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

shiv sena:’शिवसेना बॅक टू पव्हेलियन येऊ शकते’; रामदास आठवलेंच्या वक्तव्यामुळे चर्चा

8

हायलाइट्स:

  • शिवसेना बॅक टू पव्हेलियन येऊ शकते, आमची तशी अपेक्षा आहे- रामदास आठवले.
  • राजकारणात अशक्य ते शक्य होऊ शकते- रामदास आठवले.
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनडीएत यायला हवे- आठवले.

खोपोली: केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिवसेनेबाबत (Shiv Sena) एक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. आगामी काळात शिवसेनचे बॅक टू पव्हेलियन होऊ शकते. आमची तशी अपेक्षा आहे, असे वक्तव्य आठवले यांनी केले आहे. राजकारणात अशक्य ते शक्य होऊ शकते, असेही आठवले यांनी म्हटले आहे. (shiv sena may come back to pavilion says union minister ramdas athawale)

आठवले खोपोली येथे बोलत होते. नगरपालिकेने बसविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राजकारणात काहीही होऊ शकते हे सांगत असताना मी नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेलो नसतो तर केंद्रात मंत्री झालो नसतो. तसेच उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर कदाचित मुख्यमंत्री झाले नसते. तर १९९० साली मी एकटाच शरद पवार यांच्यासोबत गेलो. त्यामुळे मंत्री होऊ शकलो आणि बाकी सगळे मागे राहिले, असे आठवले म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- मोठा दिलासा! राज्यात करोना संसर्गाचा आलेख येतोय खाली; मृत्यू घटले

काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवेसना हे पक्ष जर एकत्र येऊ शकतात, तर मग भविष्यात भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का एकत्र येऊ शकत नाही?. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनडीएत यायला हवे,असे आवाहन आठवले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘…अन्यथा महाराष्ट्र बंद करू’; काँग्रेस नेते नाना पटोले यांचा भाजपला इशारा

‘… ते मात्र सगळे मागे राहिले’

मी जेव्हा १९९० मध्ये शरद पवारांसोबत गेलो, तेव्हा मी बाळासाहेब आंबेडकर, गवई, कवाडे या सर्वांना आमच्याबरोबर येण्यास सांगत होतो. ते आले नाहीत. मला म्हणाले की तुम्ही एकटेच जा. मी एकटाच गेलो आणि मंत्रीही झालो. हे मात्र सगळे मागे राहीले, असे विनोदी शैलीत आठवले म्हणाले. कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं ते आम्ही ठरवतो, एवढी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद आहे. मात्र, आमची माणसे निवडून आणण्याची सवय आम्हाला नाही. आमचा माणूस आम्ही उभा केला की आणखी दहा-पंधरा माणसे उभी केली जातात आणि मग सगळेच पडतात, असेही आठवले पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात ‘असा’ साजरा होणार नवरात्रौत्सव; राज्य सरकारने केल्या नव्या गाइडलाइन जारी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.