Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Buddha Purnima 2024 Wishes : बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश! गौतम बुद्धांच्या विचारांनी मिळेल जगण्याचा नवा मार्ग

9

Buddha Jayanti Purnima 2024 Wishes In Marathi :

हिंदू पंचांगानुसार बुद्ध पौर्णिमेचा सण हा दरवर्षी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा किंवा पिंपळ पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. यंदा ही बुद्ध पौर्णिमा २३ मे रोजी साजरी केली जाणार आहे.

भगवान विष्णूचा नववा अवतार म्हणजे महात्मा गौतम बुद्ध. यांच्या विचारांनी जगण्याची नवी दिशा मिळते. या दिवशी बौद्ध अनुयायी बौद्ध मठात एकत्र जमतात. दीप प्रज्वलन करुन बुद्धांच्या शिकवणीचे पालन करण्याची शपथ घेतात. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना पाठवा गौतम बुद्धांचे सुंदर विचार
Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची का केली जाते पूजा? जाणून घ्या मंत्र आणि पूजा पद्धत

1. बुद्ध पौर्णिमा तिथी

बुद्ध पौर्णिमेची तिथी २२ मे ला संध्याकाळी ५.५७ मिनिटांनी सुरु होईल तर गुरुवारी २३ मे ला संध्याकाळी ६.४१ मिनिटांना समाप्त होईल. उदयनतिथीनुसार २३ मे ला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल.

2. बुद्धांचा अष्टांग मार्ग

भगवान बुद्धांचा अष्टमार्गी हे दु:ख सोडवण्याचा मार्ग दाखवणारे माध्यम आहे. ज्ञान, संकल्प, वाणी, कृती, राहणीमान, व्यायाम, स्मृती आणि समाधी यातून अष्टांग मार्ग सिद्ध होतो. गौतम बुद्धांनी माणसाच्या अनेक दु:खांचे श्रेय स्वत:च्या अज्ञानाला आणि खोट्या दृष्टीने दिले आहे. गौतम बुद्ध म्हणतात राग, व्यभिचार, कपट, मत्सर आणि इतरांची निंदा करणे माणसाला अपवित्र बनवते.
Buddha Purnima 2024 : दु:खातून मुक्त होण्यासाठी महात्मा गौतम बुद्धांचे अनमोल विचार लक्षात ठेवा, मानसिक तणाव होईल दूर

3. गौतम बुद्धांचे विचार

  • मनाची शांतता ही आतमध्ये असते, बाहेर शोधण्याचा प्रयत्न करु नका.
  • भूतकाळात राहून भविष्याची स्वप्न पाहू नका, वर्तमानावर लक्ष केंद्रित करा.
  • आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आणि निष्ठा हे सर्वोत्तम नाते आहे.

Vaishakh Purnima 2024 : वैशाख पौर्णिमा कधी? चंद्राला अर्घ्य देताना या चुका करु नका

4. बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा संदेश

सत्याला साथ देत राहा,
चांगलं विचार करा, चांगलं बोला,
प्रेमाच्या प्रवाहाप्रमाणे वाहत राहा,
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येकजण भगवान बुद्धांच्या ध्यानात तल्लीन असतो आणि
त्यांच्या हृदयात शांती नांदत असते,
म्हणूनच ही बुद्ध पौर्णिमा सर्वांसाठी खास आहे,
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

निसर्ग, शांतता आणि प्रेम
ही भगवान बुद्धांची दिशा आहे
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

शांती आणि अहिंसेचे दूत भगवान बुद्ध यांना
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

प्रत्येकजण बुद्धाच्या ध्यानात मग्न आहे,
त्यांच्या हृदयात शांती वास करते,
म्हणूनच ही बुद्ध पौर्णिमा
प्रत्येकासाठी खूप खास आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.