Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सराफ दुकानात चोरी करणारी बुरखादारी महीलेस अकोला येथुन घेतले ताब्यात….

9


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

पुसद येथील सोन्याचे दुकाणात चोरी करणाऱ्या महीलेला अकोला येथून ताब्यात घेवुन पुसद शहर हददीतील ०९ गुन्हे उघडकीस आणुन केला १,४२,८७०/- रु मुददेमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळची कारवाई..,,

पुसद(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि (१७) रोजी यातील फिर्यादी संदिप बंडोपंत जिल्हेवार वय ४९ वर्षे रा. हटकेश्वर वार्ड यांनी पो.स्टे. पुसद शहर येथे तक्रार दिली की, त्यांचे सुभाष टॉकीज समोरील सोन्याचे दुकाणात एका बुरखाधारी महीलेने येवुन कानातील टॉप्स घ्यायचे आहेत असे सांगीतल्याने ते नमुद ग्राहक महीलेस सोन्याचे टॉप्स व गळयातील चैनचे विविध प्रकार दाखवित असतांना नमुद महीलेने हातचलाखीने दुकाणातील सोन्याचे टॉप्स वजन २० ग्रॅमचे चोरुन नेले

अश्या तक्रारी वरुन अप.क्र. ३१८/२०२४ कलम ३८० भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता व नमुद बुरखाधारी महीलेचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले होते तिची कोणतीही ओळख पटत नव्हती सदर गुन्हयाचा समांतर तपासा करण्याच्या सुचना वरीष्ठांकडुन निर्गमीत करण्यात आल्या होत्या. दि (२१) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद शहरात प्रलंबित  गुन्हे उघडकीस आणन्याचे दृष्टीने रेकॉर्ड वरील आरोपी चेक करण्या करीता पेट्रोलींग करीत असतांना पथकाला गोपणीय माहिती प्राप्त झाली की,नमुद सोन्याचे दुकानात चोरी करणारी महीला ही अकोला येथील आहे. तेव्हा पथकतील अधिकारी अंमलदार यांनी खबरे
प्रमाणे अकोला येथे जावुन स्थानिक अकोट फैल येथील व स्था. गु.शा. अकोला येथील पोलिस पथकाचे मदतिने नमुद संशयीत महीलेच्या घराचा शोध घेवुन सदर महीला मुमताज परविन अब्दुल शकील वय ५४ वर्षे रा. लब्बैक कॉलनी अकोट फैल,अकोला. हिचे कडे कौशल्यपुर्वक विचारपुस करुन तिने नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले

सदर गुन्हयात तिचे कडुन चोरुन नेलेले दागिने १) सोन्याच्या पेंडल १४.४३०ग्रॅम कि.अ. १,०१०१०रु, २) ५.९८०ग्रॅम सोन्याचे
टॉप्स कि.अ.४१,८६०/ रु असा एकुण १,४२,८७०/-रुपयाचा मुददेमाल मिळुन आल्याने ताब्यात घेतला, सदर महीला
आरोपीत मुमताज परविन अब्दुल शकील वय ५४ वर्षे रा. लब्बैक कॉलनी अकोट फैल, अकोला हिस पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन पुसद शहर चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई ही पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड,अपर पोलिस अधीक्षक  पियुष जगताप, सहा पोलिस अधीक्षक,पुसद  पंकत अतुलकर पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा. आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे पोहवा सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, तेजात रणखांब, रमेश राठोड, पोलिस शिपाई र मंहमद ताज चालक पोउपनि रविद्र शिरामे स्था.गु.शा. यवतमाळ व महीला पोलिस शिपाई वर्षा पाईकराव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.