Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वाचा: ‘यूपीत इतकं मोठं मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया आर्यन खानच्या बातम्या देतोय’
”लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांच्या हत्यांनी देश हादरला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशच्या रामभूमीवर चिरडण्यात आले. ज्या भूमीवर शेतकरी दोन वर्षांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत, त्यांचा आक्रोश ऐकायला सरकार तयार नाही. गाझीपूरच्या सीमेवर लोखंडी पिंजरे चारही बाजूंनी उभे करून शेतकऱ्यांना बंदिवान बनवून ठेवले. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. अश्रुधूर, लाठ्या चालविल्या गेल्या. इतकं सगळं करण्यापेक्षा सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य का करीत नाही? त्यांचं म्हणणं का ऐकत नाही? शेतकरी ठार मेला तरी चालेल, पण सरकार एक इंचही मागे हटणार नाही, हा ताठा व बाणा स्वकियांविरुद्ध जितका आहे, तितका परकीय आक्रमकांविरुद्ध दिसत नाही! लखीमपूर खेरीच्या सीमा ज्या पद्धतीनं सीलबंद केल्या, तेवढा ताठा चीन सीमेवर दाखवला असता तर लडाखच्या हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी झालीच नसती. तिथं चिनी सैन्य रोज पुढं येतंय आणि देशात शेतकऱ्यांची आणि राजकीय विरोधकांची नाकाबंदी चालली आहे,’ अशी जळजळीत टीका शिवसेनेनं केली आहे.
वाचा: बड्या दलालांना अटक होऊनही मुंबईत कुठून व कसे येतेय ड्रग्ज?
महाराष्ट्रातील भाजप नेते मराठवाडा, विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर पोहोचले. तेव्हा त्यांना कोणी रोखलं नाही, पण उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडून मारले गेले. शेतकऱ्यांना मारायचं व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायची ही कसली लोकशाही?,’ असा सवालही शिवसेनेनं केला आहे.