Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मल्टिपल अकाउंटला सपोर्ट
मेटा-मालकीच्या मेसेजिंग ॲपने आता ॲपमध्ये मल्टिपल अकाउंटला सपोर्ट दिला आहे आणि युजर्स केवळ दोन नंबरवरून व्हॉट्सॲप चालवू शकत नाहीत तर ॲपमध्ये एका खात्यातून दुसऱ्या खात्यावर सहजपणे स्विच करू शकतात. यासाठी वेगळे व्हॉट्सॲप बिझनेस किंवा इतर कोणतेही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. आताही अनेक युजर्सना याबद्दल माहिती नाही, म्हणून येथे स्टेप बाय स्टेप पद्धत सांगणार आहोत.
फॉलो करण्यासाठी सोप्या स्टेप्स
- सर्वप्रथम, तुमच्या फोनमधील नवीनतम आवृत्तीमध्ये WhatsApp अपडेट करा आणि ते उघडा.
- आता तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला टॅप करून सेटिंग्ज उघडावे लागतील.
- सेटिंग्जमध्ये तुमच्या नावापुढील डाउन ॲरोवर टॅप करा.
- येथे तुम्हाला Add account पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
- तुम्हाला समोर दिसणाऱ्या माहितीच्या खाली दिलेल्या Agree आणि continue बटणावर टॅप करावे लागेल.
- आता दुसरा नंबर टाका ज्यावरून तुम्हाला व्हॉट्सॲप वापरायचे आहे.
- स्क्रीनवरील सूचना फॉलो करा आणि आवश्यक परमिशन द्या.
- शेवटी व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर या नंबरवरूनही व्हॉट्सॲप सुरू होईल.
दोन्ही अकाऊंट होतील स्वातंत्र्यपणे हॅन्डल
तुम्हाला हवे तेव्हा तुमचे खाते सहज बदलता येईल आणि दोघांच्या चॅट्स स्वतंत्रपणे ऍक्सेस करता येतील.
तुमच्याकडे एकाच फोनवर दोन WhatsApp अकाऊंट असल्यास नोटिफिकेशनना गोंधळात टाकण्यापासून रोखण्यासाठी, तुम्ही दोन्ही अकाऊंटसाठी स्वतंत्रपणे नोटिफिकेशन टोन सेट करू शकता. याशिवाय त्यांच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये वेगवेगळे बदल करण्याचा पर्यायही असेल.