Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
डिजाईन आणि बिल्ड क्वॉलिटी
हे टीडब्लूएस बड्स काळा, गुलाबी, निळा आणि पांढरा या तीन कलरमध्ये येतात, माझ्याकडे कला व्हेरिएंट आला होता. हे इअरबड्स पारदर्शक नाहीत पण याची चार्जिंग केस टॉप आणि बॉटमला ट्रान्सपरंट आहे. बॉटम पार्टमधून आतले कंपोनंट दिसतात जे मला आवडले.
परंतु जी ट्रान्स्परंट प्लास्टिक लेयर आहे तिच्यावर सहज स्क्रॅच आले आहेत. त्यामुळे फक्त काही दिवसांत हे नवीन इअरबड्स जुने वाटू लागले आहेत. तसेच यातील हिंज देखील केस सहज ओपन करू देत नाहीत. आतले इअरबड्स पण प्लास्टिकचे आहेत.
ऑडिओ क्वॉलिटी
या बड्सची ऑडिओ क्वॉलिटी अॅव्हरेज म्हणता येईल. यात हेव्ही बेस मिळत नाही, तसेच याची म्युजिक क्वॉलिटी छाप सोडत नाही. कॉल क्वॉलिटी देखील सरासरी आहे. यात अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन नाही परंतु त्याची कमतरता जाणवत नाही. फुल व्हॉल्युमवर या डिवाइसचा आवाज लीक होत नाही.
बॅटरी लाइफ
प्रोमेट ट्रान्सपॉड 26 तासांचा बॅटरी बॅकअप देतात असा दावा कंपनीनं केला आहे. सिंगल चार्जवर मला या इअरबड्सनी 2 दिवस सहज साथ दिली.
कम्फर्ट आणि फिटिंग
Promate Transpods TWS Earbuds योग्यरीत्या कानात फिट होतात आणि कितीही धावपळ केली तरी हे कानातून जागचे हलत नाहीत. परंतु 1.30 तासांच्या वर हे इअरबड्स मी वापरू शकलो नाही, कारण यांच्या हार्ड प्लास्टिकमुळे माझे कान दुखू लागले.
निष्कर्ष
प्रोमेट ट्रान्सपॉड ची किंमत 1,999 रुपये आहे. या किंमतीत हे सरासरी साऊंड क्वॉलिटी देतात. फिटिंग मला आवडली नाही पण बॅटरी बॅकअप ओके म्हणता येईल. फक्त डिजाइनसाठी हे खरेदी करता येतील, पण यापेक्षा चांगले फीचर्स असलेले अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.