Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Road Accident In US: अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात; ३ विद्यार्थी मृत्यू तर दोघे जखमी

6

अल्फारेटा (अमेरिका) : अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या अल्फारेटा येथे १४ मे रोजी झालेल्या एका कारच्या अपघातात तीन भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. पाचही विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारचा अपघात हा अतिवेगामूळे चालकाचा त्यावरील ताबा सुटल्याने झाला असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे प्राथमिक म्हणणे आहे.

सदर अपघातातील सर्व विद्यार्था हे १८ वर्षांचे असून ते जॉर्जिया विद्यापीठ व अल्फारेटा हायस्कूल येथे शिकत होते. १४ मे रोजी ते प्रवास करत असलेल्या कारचा ताबा सुटला.अपघात इतका भीषण होता की, कार प्रचंड वेगाने रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडकून पलटी झाली. यात आर्यन जोशी आणि श्रीया अवसरला यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या अन्वी शर्मा हीचा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

अपघातात निधन झालेली श्रीया अवसरला ही जॉर्जिया विद्यापीठाच्या UGA Shikaari या डान्स टीमची सदस्य होती तर अन्वी शर्मा ही UGA Kalakaar या संगीत समुहासोबत काम करत होती. त्यांचे अचानक जाणे हे प्रचंड धक्कादायक असल्याचे सांगत या दोन्ही समुहांनी त्यांच्या आठवणी सांगत आपली संवेदना व्यक्त केली. आर्यन जोशी हा पुढील आठवड्यात हायस्कूलमधून पदवीधर होणार होता. “तो आमच्या सर्वात मोठ्या समर्थकांपैकी एक होता. आमच्या प्रत्येक विजयामध्ये त्याचा मोलाचा वाटा होता.” अल्फारेटा क्रिकेट संघाने आपल्या इंन्स्टाग्राम पोस्टमधून आर्यनच्या स्मृतींना उजाळा दिला.

जखमी विद्यार्थ्यांमध्ये रिकवाथ सोमपल्ली आणि मोहम्मद लियाकत यांचा समावेश असून त्यांच्यावर अल्फारेटा येथील फल्टन हॉस्पिटल येथे उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

यासंबंधी जॉर्जिया विद्यापीठाने देखील निवेदन प्रसिद्ध केले असून या अपघातामध्ये निधन झालेल्या विद्यार्थ्यांप्रती आपली संवेदना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “जॉर्जिया विद्यापीठ समुदाय या दुख:द अपघातात गमावलेल्या प्राणांबद्दल शोक व्यक्त करत आहे. या कठीण प्रसंगातून जाणारे त्यांचे कुटुंबिय व प्रियजनांप्रति आमची सखोल संवेदना आहे. त्यांच्या आठवणी त्यांना ओळखणाऱ्या सर्वांना सांत्वन आणि शक्ती देतील अशी आम्हाला आशा आहे.”

गेल्या महिन्यात ऍरिझोना येथे झालेल्या एका अपघातात वाहनांच्या धडकेत तेलंगणातील दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.