Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मिळालेल्या माहितीनुसार, हापुड येथील अशोकनगरमध्ये लग्न समारंभ सुरू होता. तेव्हा वरमाला टाकण्याची वेळ होती. तेव्हा वराने वधूला स्टेजवर सर्वांसमोर किस केले. वराच्या या कृतीमुळे वधू मंडळीतील लोक भडकले. त्यांनी वरासोबतच वरातीतील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. बघता बघताच दोन्ही पक्षात जबरदस्त मारामारी झाली. वर पक्षातील रागवलेल्या लोकांनी वधू पक्षावर आपला राग काढत त्यांना काठी,रॉडने हल्ला करत दगडफेकीस सुरुवात केली.
यात वधू मंडळीचे किमान ६ लोक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि जखमींना जवळच असलेल्या दवाखान्यात दाखल केले. तसेच दोन्ही पक्षातील लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या धक्कादायक घटनेनंतर वधूची पाठवणी न होताच वरात अशीच परतली. पोलिसांनी सांगितले की, कलम-१५१, शांतिभंग केल्याची कारवाई दोषींवर करण्यात आली आहे.
घटनेबाबत वधूच्या पित्याने सांगितले की, सोमवारी रात्री त्यांच्या दोन मुलींची लग्न होती. मोठ्या मुलीची गुलावती येथील सुभाषनगरमध्ये आणि छोट्या मुलीची शिवनगर येथून वरात आली होती. मोठ्या मुलीचे लग्न सुभाषनगरमधील तरुणाशी कोणत्याही अडचणीशिवाय पार पडले. पण छोट्या मुलीच्या जयमालाच्या वेळेस वाद झाला. वराने जबरदस्ती मुलीला किस केले. यामुळे घरातील लोक भडकले व दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला.
वाद एवढा वाढला की, वरपक्षातील लोकांनी काठ्या, लाठ्या आणि रॉडने हल्ला केला. दगडफेकही केली. ज्यात वधूच्या पित्यासह ६ लोक गंभीर जखमी झाले. वरात जरी अशीच परतली असली तरी त्याच मुलासोबत मुलीचे लग्न करण्यात आले. या घटनेत हापुडचे एसीपी अभिषेक वर्माने सांगितले की, लग्न समारंभावेळी भांडण झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. याप्रकरणी अद्याप कोणत्या पक्षाकडून तक्रार करण्यात आली नाही आहे. तक्रार दाखल झाल्यास आम्ही कारवाई करु. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांवर शांतिभंगचा गुन्हा दाखल केला आहे.