Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इराणचे राष्ट्राध्यक्ष रायसींचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी अंत, तज्ज्ञांनी सांगितलं अपघाताचं कारण…

6

तेहरान : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी देशाच्या वायव्येकडील दुर्गम दरीत कोसळले. या अपघातात रायसी आणि अमीर अब्दुल्लाहियान यांचा मृत्यू झाला आहे. याबद्दल इराणच्या शासकीय वृत्तवाहिनीने मृत्यूची माहिती दिली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहियान यांसारख्या दोन वरिष्ठ नेत्यांसोबतची ही घटना अशावेळी घडली आहे जेव्हा इराण अनेक संघर्षात अडकला आहे. तर ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘रायसी यांचे हेलीकॉप्टर अचानक धुक्यात सापडले.अल जझीरा या वृ्त्तवाहिनीला माहिती देताना तज्ज्ञ सांगतात, ‘जेव्हा तुम्ही उड्डाण करता आणि हवामान स्वच्छ असते तेव्हा सर्व काही ठीक असते, परंतु वैमानिक जेव्हा डोंगराळ, खडबडीत आणि जंगली प्रदेशात प्रवेश करतात तेव्हा समस्या उद्भवते आणि तुम्हाला अपेक्षित नसलेल्या ठिकाणी देखील धुके उत्पन्न होतात आणि ते कधीही वैमानिकावर हल्ला करु शकतात’
Helicopter Crash: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश; दाट धुके आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे
बचाव पथकाकडून आलेल्या व्हिडिओवरुन असे समजते की, हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. केबिनचे मोठे नुकसान झाले असून ते संपूर्ण जळाले आहे. या भीषण घटनेत कोणीही जिवंत राहण्याची चिन्ह दिसत नाहीत.
Chabahar Port Deal: चाबहार बंदराबाबत भारत-इराणमध्ये महत्त्वाचा करार, जाणून घ्या या कराराबद्दल…
तत्पूर्वी गंभीर आर्थिक संकट आणि इस्रायलसोबतच्या संघर्षात सुद्धा शासन करत असताना रायसींची कट्टर भूमिका देशांतर्गत राजकारणात सर्वव्यापी ठरली होती. अली खुमैनी यांच्यानंतर अनेक लोक रायसी यांना देशाचा भावी सर्वोच्च नेता म्हणून पाहत होते. त्यांच्या जाण्याने इराणच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.