Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- ‘राज्याचा अर्थसंकल्प: माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात’ कार्यशाळेचा शुभारंभ
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं मार्गदर्शन
- करोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी केलं महत्त्वाचं विधान
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित ‘राज्याचा अर्थसंकल्प: माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात’ या दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. ‘आजवर शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्राकडं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं. करोनाची साथ आणि नैसर्गिक संकट आल्यानंतर सर्वांची दाणादाण उडाली. अशा स्थितीतही जगात कुठेही नसतील इतक्या वेगानं नि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या. लोकांचे जीव वाचवण्यास आपलं प्राधान्य असल्यामुळं मागील दोन वर्षात आरोग्य क्षेत्राला अधिक निधी दिला,’ असं मुख्यमंत्री म्हणाले. करोनाची तिसरी लाट ओसरलीय असं म्हटलं जातंय, तसा थोडा अनुभवही येतोय. तिसरी लाट येऊ नये ही प्रार्थना आहेच, पण त्याला प्रयत्नांची साथ हवी आहे. पण तिसरी लाट आलीच तर काय करायचं? त्यासाठी आज उभ्या करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची काळजी घेण्याची गरज आहे. त्या सुविधा योग्य प्रकारे चालू राहतील हे पाहणं महत्त्वाचं आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
वाचा: भाजपची नियत दिसली! यूपीतील घटनेची पवारांनी केली ‘जालियनवाला’शी तुलना
‘आपत्तीच्या प्रसंगात शासनाकडून वाढीव मदत दिली जात आहे. पण राज्य सतत आपत्तीच्या प्रसंगांना सामोरं जातंय. निसर्ग, तौक्ते, गुलाब… एकापाठोपाठ एक संकट येताहेत. आता आलेलं गुलाब वादळ पश्चिम किनाऱ्यावर धडकणार नाही असं म्हणत असताना राज्याला या गुलाबाचे काटे टोचले आणि अतिवृष्टीनं शेतीचं नुकसान झाल. त्यातूही मार्ग काढत आपण पुढं जात आहोत. आपत्तीत सर्वस्व हरवलेल्याना धीर देण्याचं काम करावं लागतं. हे करताना खोटी आश्वासनं देता कामा नये. मी स्वत: हे करतो, भलेही माझ्यावर टीका होत असेल, मला त्याची पर्वा नाही,’ असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
वाचा: कोल्हापूर हादरले! हळदकुंकू लावलेल्या अवस्थेत आढळला बालकाचा मृतदेह