Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Kami Rita Sherpa : नेपाळचे कामी रिता शेर्पा यांनी मोडला स्वत:चाच रेकॉर्ड; ३०व्यांदा ‘एव्हरेस्ट’वर चढाई

9

वृत्तसंस्था, काठमांडू : नेपाळमधील ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रिता शेर्पा यांनी बुधवारी तब्बल ३०व्या वेळी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवून, स्वत:चाच १० दिवसांपूर्वी केलेला विक्रम मोडीत काढला.

५४ वर्षीय कामी रिता शेर्पा यांनी बुधवारी सकाळी, स्थानिक वेळेनुसार ७.४९ मिनिटांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले, अशी माहिती ‘१४ पीक्स एक्सपीडिशन’ या स्पोर्ट्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ताशी लाकपा शेर्पा यांनी दिली. कामी यांनी १२ मे रोजी एव्हरेस्ट शिखर २९व्या वेळी सर केले होते. आठ हजार ८४९ मीटर उंचीचे एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याचा मोसम सध्या सुरू असून देशोदेशींचे अनेक गिर्यारोहक आपले कसब पणाला लावत आहेत.

कामी रिता शेर्पा हे ‘१४ पीक्स एक्सपीडिशन’ आणि ‘सेव्हन समिट ट्रेक्स’ या कंपन्यांमधील वरिष्ठ गिर्यारोहण मार्गदर्शक असून मागील अडीच-तीन दशके एव्हरेस्ट मोहिमा करत आहेत. १७ जानेवारी १९७० रोजी जन्मलेले कामी रिता शेर्पा यांनी १९९२मध्ये एव्हरेस्ट मोहिमांसाठी सहायक कर्मचारी म्हणून आपल्या गिर्यारोहणाच्या प्रवासाला प्रारंभ केला. मे १९९४मध्ये त्यांनी सर्वप्रथम एव्हरेस्टवर पाऊल ठेवले. एव्हरेस्टच्या जोडीलाच, माउंट के२, चो ओयू, ल्होत्से आणि मानसलू या शिखरांवरही त्यांनी यशस्वी चढाई केली आहे. मागील वर्षी या मोसमात कामी रिता यांनी दोन वेळा एव्हरेस्टवर पाऊल ठेवले होते. कामी रिता यांच्या पाठोपाठ ४६ वर्षीय पसद दावा शेर्पा यांनी आजपर्यंत २७ वेळा एव्हरेस्ट शिखर सर केले आहे.

२०२४चा एव्हरेस्ट मोसम
परवानगी घेतलेल्यांची संख्या
४१४ गिर्यारोहक, ४१ मोहिमा

सर्वांत पहिले एव्हरेस्टवीर
एडमंड हिलरी-तेनसिंग नोर्गे (१९५३)

२०२३पर्यंतचे एकूण एव्हरेस्टवीर
७,०००

एव्हरेस्ट मोहिमांमध्ये प्राण गमावलेल्यांची संख्या
३००

ब्रिटीश नागरिकासह दोघे बेपत्ता
काठमांडू : एव्हरेस्ट शिख

सर सर करून खाली उतरत असताना पडल्यानंतर एक ब्रिटीश गिर्यारोहक आणि एक शेर्पा असे दोघे मंगळवारपासून बेपत्ता आहेत. यूकेमधील डॅनियल पॉल पीटरसन आणि मकालू, संगकुवासभा येथील पास तेनजी शेर्पा अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही ‘८के एक्सपीडिशन’ या मोहिमेचे सदस्य होते. मंगळवारी पहाटे ४.४० वाजता त्यांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.