Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Xiaomi Smart TV A Series 2024 Edition
शाओमीची नवीन स्मार्ट टीव्ही सीरीज 30 इंच, 40 इंच आणि 43 इंचाच्या स्क्रीन साइज मध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीच्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1,920 x 1,080 पिक्सल, कलर डेप्थ 16.7 मिलियन आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. यात चांगल्या पिक्चर क्वॉलिटीसाठी Vivid Picture इंजिन देण्यात आलं आहे. याच्या 40 आणि 43 इंचाचा टीव्हीमध्ये Quad-core Cortex A55 प्रोसेसर मिळतो, तर 32 इंचाच्या टीव्हीमध्ये Quad-core Cortex A35 प्रोसेसर देण्यात आला आहे.
कंपनीनं नवीन सीरीजच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 1.5GB पर्यंत रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यात Google TV सह Xiaomi TV+ आणि Patchwall+ चा सपोर्ट मिळतो. तसेच, टीव्हीमध्ये 20W चे स्पिकर देण्यात आले आहेत, जे Dolby Audio, DTS:X आणि DTS Virtual: Xसह येतात.
शाओमीच्या नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये OTT अॅप्स वापर करण्यासाठी इन-बिल्ट क्रोमकास्ट देण्यात आला आहे. यात Universal Search, Kids Mode आणि Parental लॉक सारखे फीचर्स देखील मिळतात. इतकेच नव्हे तर टीव्हीज मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0, वाय-फाय, 2 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत.
Xiaomi Smart TV ची किंमत
Xiaomi Smart TV A Series 2024 मध्ये येणाऱ्या 32 इंचाच्या टीव्हीची किंमत 12,999 रुपये आहे. तर, या सीरीजचा 40 इंच आणि 43 इंचाचा टीव्ही अनुक्रमे 22,999 रुपये आणि 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या लाइनअपचे टीव्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून विकत घेता येतील.