Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दिल्लीत केजरीवालांना अजिबात सहानुभूती नाही, सातही जागा आम्ही जिंकू : फडणवीस

9

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल जनतेत कुठलीही सहानुभूती नसून दिल्लीच्या सातही जागांवर भाजपच तिसऱ्यांदा विजयी होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांना ४ जूनपर्यंत स्वप्ने पाहण्याचा अधिकार आहे पण देशात आणि महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच येणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत प्रचार केला. कॅनॉट प्लेस भागात विशेष संपर्क अभियानात बोलताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास योजनांची माहिती दिली.

देशाने स्वातंत्र्योत्तर काळात ‘गरीबी हटाव’ची घोषणा देऊन प्रत्यक्षात स्वतःचीच गरिबी हटवणारे नेते व पक्ष पाहिले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतरच्या दशकात गरिबीच नव्हे तर गरीब असण्याची भावनाच समूळ नष्ट करण्याचे शाश्वत प्रयत्न केले त्यामुळेच केवळ १० वर्षांत भारतातील २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले. या ‘मोदीनॉमिक्स’ने जगभरातील अर्ततज्ज्ञ चकित झाले असेही फडणवीस म्हणाले. आधार-मोबाईल व योजनांचा पैसा थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करणे (डीबीटी) या त्रिसूत्रीद्वारे गरीबकल्याण योजनांचे लाभ पोबोचविण्याची पध्दत मोदी यांच्या काळात बदलली हाही चमत्कार असल्याचे ते म्हणाले.
Devendra Fadnavis: फडणवीसांचा नकार, एक कॉल अन् उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, मोदींनी फोनवर काय सांगितलं?

जीएसटीवर विरोधकांची टीका, फडणवीसांनी इतिहास सांगितला

फडणवीस म्हणाले की, जीएसटीवर टीका करणारे हे विसरतात की हा कायदा लागू करण्याआधी देशात वेगवेगळे २० कर द्यावे लागत होते. एक मोठी अनधिकृत व्यवस्थाच समांतर सुरू होती. जीएसटीमुळे ती बंद होऊन प्रामाणिक करदात्यांवरील अन्याय दूर झाला. प्रचलित जीएसटीमध्ये सुधारणांना वाव असला तरी जीएसटी लागू झाल्यावरच देशात करसंकलाचे विक्रम झाले. महाराष्ट्रात २०१७ मध्ये व्हॅटद्वारे ७५ हजार कोटी जमा झाले होते. मात्र मागच्या वर्षी जीएसटीद्वारे राज्यात २ लाख ४० हजार कोटींचे करसंकलन झाले.

आगीच्या कारणाची माहिती घेतोय

डोंबिवलीतील दुर्घटनेत आगीचे नेमके कारण काय याची माहिती घेतली जात असल्याचे फडणवीस म्हणाले. या आगीतील सात मृतदेह सापडले आहेत व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी आज दुपारी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.