Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
जबरी चोरीतील चोरटा बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात; 3 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त…
बुलढाणा (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी, तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन, पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी नमुद गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करुन, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून, गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोनि. अशोक लांडे स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र पथके तयार करुन, त्यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्ह्याची उकल करुन, आरोपीतांचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या होत्या.
फिर्यादी विष्णु प्रल्हाद खरात (वय 37 वर्षे), रा.तुळजापूर यांनी रिपोर्ट दिला की, (दि.03मे) रोजी गजानन पेट्रोलपंप, सिंदखेड राजा येथून पेट्रोलपंपाची दिवसभराची कॅश घेवून जात असतांना, अज्ञात 02 ईसमांनी त्यास चालत्या गाडीवर काठी मारुन थांबण्यास सांगीतले. व त्याचे जवळील कॅशची थैली जबरदस्तीने हिसकावून, त्यातील रक्कम 1,196,130/-रुपये घेवून, पळून गेले. नमुद प्रकरणी (दि.04मे) रोजी पो.स्टे. सिंदखेड राजा येथे गुरनं. 87/2024 कलम 394,34 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद होता. तसेच फिर्यादी किशोर लक्ष्मण वाघमारे (वय 48 वर्षे), रा.सिंदखेड राजा यांनी रिपोर्ट दिला की, (दि.17मे) रोजी त्यांच्या राहत्या घरासमोरुन त्यांची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाची गाडी क्र.MH-28-V-8804 किं.अं. 3,75,000/-रु. ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. रिपोर्टवरुन (दि.17मे) रोजी पो.स्टे. सिंदखेड राजा येथे गुरनं. 93/2024 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद केला होता.
भादंवि क्र.394 मध्ये अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढीलप्रमाणे – (1) आरोपी- आशिष भास्कर मोरे (वय 19 वर्षे) रा.नसीराबाद सिंदखेड राजा, जप्त मुद्देमाल- नगदी 10,900/-रुपये, (2) भादंवि क्र. 379 मध्ये जप्त मुद्देमाल – एक स्विफ्ट डिझयर गाडी किं.3.75.000/-रुपये
गुन्ह्यातील फरारी आरोपीतांचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्थागुशा. यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथके तयार करण्यात आले असून, सदर पथक कडून गुन्ह्यामध्ये फरारी आरोपीतांचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यात होत असलेल्या जबरी चोरी तसेच वाहन चोरीच्या घटनांना अत्यंत गांभीर्याने घेवून, गुन्ह्यातील आरोपींचा शोध तसेच गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदर अनुशंगाने. पोनि. अशोक एन. लांडे, स्थानिक गुन्हे शाखा- बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस स्टाफ यांची पथके तयार करुन, त्यांना गुन्हे संबंधाने गोपनीय माहिती संकलीत करणे, अशा गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हालचालींवर लक्ष ठेवणे, तांत्रीक स्वरुपामध्ये तपास करणे, जिल्हा व जिल्हया बाहेरील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे बाबत सुचनात्मक मार्गदर्शन केले. सदर प्रकरणी एकंदर केलेल्या तपासामध्ये गुन्ह्यामध्ये वरील प्रमाणे तसेच फरारी 02 आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रमाणे गोपनीय खबर व तांत्रीक माहितीच्या आधारे वरील प्रमाणे गुन्ह्यांची उकल करुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
अशा प्रकारे सदरची कारवाई सुनिल कडासने- पोलीस अधीक्षक बुलडाणा, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बी.बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि.अशोक एन. लांडे, पोउपनि. रवि मोरे, पोहेकॉ. पंकजकुमार मेहेर, दिगंबर कपाटे, पोकॉ. दिपक वायाळ, चालक पोहेकॉ. समाधान टेकाळे स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांच्या पथकाने पार पाडली आहे.