Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
वसमत मधील दोन घरफोड्यांना अटक; सोने-चांदीचे दागिने जप्त…
हिंगोली (प्रतिनिधी) – वसमत शहरातील दोन घरफोड्यांच्या प्रकरणातील आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे, घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत घरफोडी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन घरफोडीच्या घटनेतील ३ तोळे सोन्याचे ६० तोळे वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आणखी घरफोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पोलीस स्टेशन वसमत शहर हद्दीतील जिबोद्दीन सिद्दीकी रा.जवाहर कॉलनी वसमत यांचे घरी कोणीच नसल्याचे संधी साधुन अज्ञात आरोपींनी घराचे कुलूप तोडुन घरातील सोन्या चांदीचे दागीने चोरी करून नेले होते. त्याबाबत फिर्यादी यांचे तकारी वरून पोस्टे. वसमत शहर येथे (दि.२९फेब्रुवारी) रोजी गुरनं.११५/२०२४ कलम ४५४,४५७,३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता. तसेच वसमत शहरातील नामे राजाभाऊ सौंदनकर रा. मंगळवार पेठ यांचे घरी कोणीच नसल्याचे संधी साधुन अज्ञात आरोपींनी नगदी रूपये व चांदीचे दागीने चोरी करून नेले होते. त्याबाबत फिर्यादी यांचे तक्रारी वरून पोस्टे. वसमत शहर येथे (दि.१०मे) रोजी गुरनं.२५८/२०२४ कलम ४५७,३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सदरचा गुन्हा तात्काळ उघड करून गुन्हयातील आरोपींना पकडुन मुद्देमाल हस्तगत करणे बाबत पोलीस अधीक्षक हिंगोली जी.श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देवुन मार्गदर्शन केले होते. पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे तपास पथकाने सदर घटनास्थळी व परीसरात भेट देवुन तपास केला तसेच गोपनीय बातमीदार व रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत कौशल्यपुर्ण पध्दतीने तपास करून नमुदचे गुन्हे हे अट्टल गुन्हेगार असलेले व ज्यांच्यावर या पुर्वी हिंगोली व नांदेड जिल्हयात घरफोडी/चोरीचे गुन्हे दाखल असलेले नामे १) रमेश सुरेश गायकवाड रा.गणेशपुर, ता.वसमत २) सतनामसिंग गुरमुखसिंग चव्हाण, रा.वसमत शहर यांनी केले बाबत निष्पन्न करून नमूद दोन्ही आरोपींना अतिशय शिताफीने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तपासात नमुद आरोपीकडुन पोस्टे वसमत शहर हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघड करून सोन्या चांदीचे दागीने जप्त करण्यात आले ते पुढीलप्रमाणे – १) १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गलसर, २) ०६ ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन, ३) ०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले रिंग, ४) ०२ ग्रॅम वजनाचे गुलबी मनी असलेले मंगळसुत्र, ५) १० तोळे चांदीचे चैन, ६) २० तोळे चांदीचे ०२ चैनीचे जोड, ७) १५ तोळे चांदीचे पायातील जोडवे १५ नग, ८) १५ तोळे वजनाचे चांदीचे कडे व बिनले/वाळे असा दोन्ही गुन्हयातील मिळुन वरील प्रमाणे चोरून नेलेले सोन्या २९ ग्रॅम वजनाचे दागीने तर चांदीचे ६० तोळे वजनाचे दागीने किंमत ८३,०००/- रू. चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.
अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक हिंगोली जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक स्थागुशा विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, तुषार ठाकरे, दत्ता नागरे यांनी केली आहे.