Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अनिश आणि अश्विनी शनिवारी रात्री दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी भरधाव वेगातील पोर्शनं त्यांना धडक दिली. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा ही कार चालवत होता. या कारची नोंदणी आरटीओमध्ये करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कारला नंबर प्लेट नव्हती. कार चालवणारा मुलगा काही वेळापूर्वीच एका पबमधून त्याच्या मित्रांसह निघाला होता. पबमध्ये त्यानं मद्यपान केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अश्विनीच्या कुटुंबानं केली आहे. आरोपीवर अल्पवयीन म्हणून नव्हे, तर सज्ञान म्हणून खटला चालवण्यात यावा. त्याला कोणतीही सवलत दिली जाऊ नये, अशी कोस्टा कुटुंबाची मागणी आहे. अल्पवयीन मुलासोबतच त्याचे पालकदेखील आमच्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनाही शासन व्हावं, अशी कुटुंबियांची भूमिका आहे.
भविष्यात तिचं लग्न होईल, आम्ही डोलीत बसवून तिची विदाई करु असं स्वप्न होतं. पण आता आमच्यावर तिचं पार्थिव उचलण्याची वेळ आली. तिला कायमचा निरोप देण्याची वेळ आली, अशा शब्दांत अश्विनीची आई ममता कोश्ता यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. अश्विनीला न्याय मिळायला हवा. त्या अल्पवयीन मुलाला, त्याच्या पालकांना कठोर शासन व्हायला हवं. त्यांनी मुलाला या वयात कारच द्यायला नको होती, असं ममता म्हणाल्या.
आमच्या लेकरांची स्वप्नं खूप मोठी होती. पण त्यांच्या अकाली जाण्यानं आमच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे, अशा शब्दांत अश्विनीचे वडील सुरेश कोश्ता यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. उज्ज्वल भविष्याची स्वप्नं माझ्या लेकीनं पाहिली होती. आपल्याला लोकांनी आपल्या मुलांच्या नावानं ओळखावं, असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. आता मला अश्विनीचा बाबा कोण म्हणणार, असा सवाल त्यांनी भरल्या डोळ्यांनी विचारला. तेव्हा उपस्थितांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या.