Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Drugs Party: ‘गृहमंत्री सुडाच्या राजकारणात मग्न’; ड्रग पार्टीवरून भाजपचं शरसंधान

15

हायलाइट्स:

  • क्रूझवरील ड्रग पार्टीवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
  • या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे.
  • अशी परिस्थिती असतानाही राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाच्या राजकारणात मग्न आहेत- अतुल भातखळकर.

मुंबई: मुंबईच्या समुद्रात क्रूझवरील ड्रग पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण विभागाने कारवाई करत बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आतापर्यंत एकूण १२ जणांना ताब्यात घेतले आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे. (drug party on cruise bjp leader atul bhatkhalkar criticizes home minister dilip walse patil)

मुंबईतील समुद्रात क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग पार्टीवर छापा टाकून एनसीबीने मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. मात्र, मुंबईत अशा प्रकारे सर्रास अमली पदार्थांची तस्करी आणि वापर होत असतानाही महाराष्ट्राचे अमली पदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहेत काय?, अशा शब्दात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे काम सोडून ठाकरे सरकार केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न आहेत, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सकारवरही टीकास्त्र सोडले आहे.

क्लिक करा आणि वाचा- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ६३ टक्के मतदान

मुंबईसारख्या शहरात अशा प्रकारची देशविघातक कृत्ये होत आहेत. मात्र, असे असतानाही राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. खरे तर अशा प्रकारांवर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, गृह विभाग हॉटेल आणि बार मालकांकडून वसुली करण्यात धन्यता मानत आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज २,४०१ नव्या रुग्णांचे निदान; एकूण सक्रिय रुग्णसंख्येत होतेय घट

‘मुंबई गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत आहे’

अतुल भातखळकर यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर देखील ताशेरे ओढले आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याचे भातखळकर म्हणाले. मुंबईत दिवसाढवळ्या खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, उद्योजक तसेच राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या येत आहेत, अपहरणाच्या घटना घडत आहेत. अशा गुन्ह्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. अशी परिस्थिती असतानाही राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाच्या राजकारणात मग्न आहेत, अशी टीका भातखळकर यांनी वळसे पाटील यांच्यावर केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी; घटस्थापनेपासून आरोग्य तपासणी करून दररोज १० हजार भाविकांना दर्शन

हे पाहता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली गुन्हेगारी, ड्रग्सची खुलेआम विक्री अशी गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यायला हवे, असेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.