Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- कोल्हापूरचे माजी महापौर सुनील कदम व सत्यजित कदम यांचे आरोप खोटे- राष्ट्रवादी काँग्रेस.
- हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यावरील आरोप हे निव्वळ वैफल्यापोटी व राजकीय द्वेषापोटी- राष्ट्रवादी काँग्रेस.
- आरोपांसदर्भात कुठेही, कोणीही चौकशी करा- राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान.
अशा विषयांमध्ये कोणतीही वस्तुस्थिती व चूक नसताना २००४ वर्षांपूर्वीचे जुनेच विषय अनाठायी उकरुन काढून शिळ्या कढीला ते नवीन ऊत आणत आहेत. त्यांची राजकीय अस्तित्वासाठी चाललेली ही केविलवाणी धडपड आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे. मोठ्या नेत्यांच्यावर चुकीचे आणि निराधार आरोप हे नैराश्यापोटीच करीत आहेत, हे नैराश्य जिल्हा परिषद व गोकुळ दूध संघासह सर्व सत्ता गेल्याचे आहे, हेही आम्ही समजू शकतो. परंतु, चुकीच्या वक्तव्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, याची ही जाणीव ठेवा. या दोन्हीही नेत्यांवर आमचा दृढ विश्वास आहे. कुठेही, कोणीही चौकशी करा, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचा ई वार्डमधील रिसनं. ८७४ रमनमळा तलाव हा पर्यटन विकास केंद्रासाठी आरक्षित आहे. त्याचे क्षेत्र १ हेक्टर ८५ आर इतके आहे. त्यामध्ये आजही कसलाही बदल नाही आणि कोणी करूही शकत नाही. ज्ञानशांती कंपनी व आमच्या संगनमताने त्या क्षेत्रामध्ये काही बदल केला आहे, असा जो कदम बंधूंचा आरोप खोटा व बालीश बुध्दीचा आहे. त्यांनी कोल्हापूर शहर सुधारित विकास योजनेच्या आराखड्याचा व्यवस्थित अभ्यास करावा, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
तसेच रि.स.नं. ८७५/ब ३/२/१/अ क्षेत्र १५१२.६५ चौ. मी. व महापालिकेचे ताब्यात असलेले तलावाचा रिसनं. ८७४ क्षेत्र १ हेक्टर ८५ आर व रि.स.नं. ८७३ या क्षेत्रामधील कोणत्याही क्षेत्राचा एक स्क्वेअर फुटाचाही कसलाही बदल झालेला नाही. याबाबत उपअधिक्षक, भूमिअभिलेख करवीर यांच्याकडूनच मोजणी होऊन त्याबाबतीतील जाहीर सुनावणी होऊन नकाशा अंतिम झालेला आहे. सदर मोजणीवेळी जागा मालक, महापालिका सर्व विभागाचे अधिकारी हजर होते. त्यानंतरच महापालिकेने तलावाचे क्षेत्र सोडून इतर क्षेत्राची कब्जेपट्टी मूळ जागा मालकांना दिलेली आहे अशी वस्तुस्थिती आहे व त्यावर पर्यटन व सहल केंद्राचे आरक्षण आजही कायम आहे, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.