Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lava Yuva 5G मध्ये मिळेल 50MP चा कॅमेरा
आगामी Yuva 5G चा एक टीजर व्हिडीओ कंपनीनं शेअर केला आहे, त्यानुसार या फोनमध्ये वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल. यात एक ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल, फोनमध्ये 50MPचा मुख्य कॅमेरा मिळेल सोबत एलईडी फ्लॅशचा समावेश केला जाईल. डिवाइसची मागील डिजाइन अलीकडेच आलेल्या लिक्सशी मिळतीजुळती आहे, त्यामुळे लीक झालेले स्पेक्स देखील खरे ठरू शकतात.
काही दिवसांपूर्वी लावाचा एक स्मार्टफोन मॉडेल नंबर LXX513 सह गीकबेंचवर दिसला होता, जी एक बेंचमार्किंग वेबसाइट आहे. गिकबेंचच्या डेटाबेसनुसार फोनमध्ये 5G सपोर्ट असलेला मीडियाटेक चिपसेट मिळेल, हा Lava Yuva 5G असू शकतो. गिकबेंच लिस्टिंगनुसार हा हँडसेट 6GB आणि 8GB रॅमसह बाजारात येईल, तसेच कंपनी यात अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टम देऊ शकते.
आगामी Lava Yuva 5G मध्ये कंपनी MediaTek Dimensity 6300 किंवा Dimensity 6080 चिपसेटचा वापर करू शकते. या प्रोसेसरमध्ये दोन परफॉर्मन्स कोर मिळतात ज्यांचा स्पीड 2.4GHz आहे तर सहा एफिशियंसी कोर मिळतात ज्यांचा क्लॉक स्पीड 2.0GHz आहे सोबत Mali G57 जीपीयू दिला जाऊ शकतो. आगामी लावा मोबाइलमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो, अशी माहिती लिक्समधून समोर आली आहे.
ज्याअर्थी कंपनी आगामी लावा युवा 5जी टीज केला आहे, म्हणजे कंपनी लवकरच हा फोन बाजरात सादर करेल. त्याआधी या स्मार्टफोनचे फीचर्स देखील समोर येऊ शकतात, ज्यांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.