Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रील व्हिडीओ बनतील जबरदस्त 50MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह Oppo चे दोन फोन लाँच; इतकी आहे किंमत

7

Oppo Reno 12 आणि Reno 12 Pro चीनमध्ये लाँच झाले आहेत. स्मार्टफोनमध्ये 50-एमपीच्या फ्रंट कॅमेऱ्यासह क्वॉड-कर्व्ड डिस्प्ले आणि 50-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा युनिट आहेत. फोन अँड्रॉइड 14 अधइरत कलरओएस 14 वर चालतात आणि IP65 रेटिंगला सपोर्ट करतात. ओप्पो रेनो 12 मध्ये मीडियाटेक Dimensity 8250 Star Speed Edition चिपसेट आहे, तर रेनो 12 प्रो मध्ये मीडियाटेक Dimensity 9200+ Star Speed Edition चिपसेट मिळतो.

Oppo Reno 12 सीरिजची किंमत

Oppo Reno 12 ची किंमत CNY 2,699 (जवळपास 31,000 रुपये) पासून सुरू होते, जी 12GB रॅम व 256GB व्हेरिएंटची किंमत आहे. टॉप मॉडेल 16GB रॅम व 512GB स्टोरेजसह CNY 3,199 (जवळपास 36,800 रुपये) मध्ये खरेदी करता येईल. स्टँडर्ड Oppo Reno 12 एबोनी ब्लॅक, मिलेनियम सिल्व्हर आणि सॉफ्ट पीच कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.
सॅमसंग-शाओमी नव्हे तर या कंपनीनं आणला 100X सुपर झूम असलेला फोन, किंमत मात्र ठेवली कमी

तसेच, Oppo Reno 12 Pro च्या बेस व्हेरिएंटची किंमत CNY 3,399 (जवळपास 39,000 रुपये) ज्यात 12GB रॅम व 256GB स्टोरेज मिळते. 16GB रॅम व 512GB जीबी स्टोरेज असलेला टॉप मॉडेल CNY 3,999 (जवळपास 46,000 रुपये) मध्ये उपलब्ध झाला आहे. Reno 12 Pro शॅम्पेन गोल्ड, एबोनी ब्लॅक आणि सिल्व्हर मॅजिक पर्पल रंगात येतो.

Oppo Reno 12 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 12 आणि Reno 12 Pro मध्ये 6.7-इंचाची फुल-एचडी+ 1.5K (2,772 x 1,240 पिक्सल) कर्व्ड OLED स्क्रीन आहे, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 1,200 nits पर्यंत पीक ब्राइटनेस, 2,160Hz PWM डिमिंग रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शनचा समावेश आहे.

बेस Oppo Reno 12 4nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 8250 स्टार स्पीड एडिशन चिपसेट वर चालतो, तर प्रो व्हर्जनमध्ये MediaTek Dimensity 9200+ स्टार स्पीड एडिशन चिपसेट आहे. फोन 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह येतो. हे Android 14-बेस्ड ColorOS 14 वर चालतात.

ओप्पो रेनो 12 आणि रेनो 12 प्रो दोन्ही मध्ये 50-मेगापिक्सलच्या मेन सेन्सरसह 20x डिजिटल झूम सपोर्टेड 50-मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेरा आणि 8-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल शूटर मिळतो. फरक इतकाच आहे की बेस मॉडेलमध्ये Sony LYT-600 प्रायमरी सेन्सर आणि Pro मॉडेलमध्ये Sony IMX890 सेन्सर आहे. दोन्ही हँडसेट मध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.

Oppo नं दोन्ही Reno 12 हँडसेट मध्ये 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन 5G, ड्युअल 4G VoLTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4, Beidou, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि USB Type-C कनेक्टिव्हिटीला देखील सपोर्ट करतात. दोन्ही फोन धूळ आणि पाण्याच्या शिंतोड्यांपासून बचाव करण्यासाठी IP65 रेटिंगला सपोर्ट करतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.