Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोकसभेत भाजपच्या स्वबळावर ३७० जागा, कोठून आला हा नंबर; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले

8

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या दोन टप्प्यातील मतदान शिल्लक आहे आणि त्याच बरोबर मतमोजणीची तारीख देखील जवळ येत आहे. राजकीय विश्लेषक, विविध राजकीय पक्ष हे कोणाला किती जागा मिळतील याची चर्चा करत आहेत. अशात देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भाजपला स्वबळावर ३७० जागा का जिंकायच्या आहेत याचे कारण सांगितले. ते म्हणाले, लोकसभेत ३७० जागा ही संख्या अशीच आलेली नाही.भाजपने लोकसभा निडणुकीत ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावर बोलताना एस जयशंकर म्हणाले, मला वाटत नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असाच या नंबरचा उल्लेख केला असेल. यावर त्यांनी नक्कीच काही तरी विचार केला असणार. यामुळे हे स्पष्ट आहे की, आम्ही काही राज्यात गेल्या वेळी सारखीच कामगिरी करू. या शिवाय काही राज्यात जसे की पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये आमच्या जागा वाढतील.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर म्हणाले, भाजप एक गंभीर पक्ष आहे आणि आम्ही अंदाजावर विश्वास ठेवत नाही. आम्ही बुथ स्तरावर विश्लेषण करतो आणि पुढे जातो. जेव्हा आम्ही म्हणतो की, पक्षाला अमुक एका राज्यात इतक्या जागा मिळतील, तर त्यावर खुप विचार केलेला असतो.
Indian Team Coaching: नेमकं खरं कोण, रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर की जय शाह? टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदावरुन नवा वाद

भाजपला किती जागा मिळतील?

पक्षाला किती जागा मिळतील या प्रश्नावर जयशंकर यांनी नेमकी संख्या निवडणूक एक्सपर्ट सांगतील. पण २०१९च्या तुलनेत यावेळी ५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मते आम्हाला मिळतील. माझ्या अनुभवाच्या आधारावर सांगतो की, आमच्या जागा कमी होणार नाही तर वाढतील.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर, २६ जून रोजी मतदान तर निकाल…

३७० +चा संबंध जम्मू काश्मीरशी

अनेक लोकांना भाजपने ३७० जागांचे लक्ष्य हे मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० कलम हटवण्यावरून ठेवण्यात आले आहे. लोकांच्या मते ३७० जागा जिंकून पक्षाला श्यामा प्रसाद मुखर्जी यांना हा विजय समर्पित करायचा आहे. २०१९ साली विजय मिळवल्यानंतर मोदी सरकारने जम्मू्-काश्मीरला देण्यात देणारा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. तसेच हा भाग जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन भागात विभागण्यात आला. भाजपने यामुळेच ३७० स्वबळावर तर एनडीएसाठी ४०० जागांचे लक्ष्य ठेवले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.