Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काही भारतात येतोय Moto G04s
फ्लिपकार्टच्या मायक्रोसाईटनुसार Moto G04s स्मार्टफोन भारतात 30 मेला लाँच केला जाईल. तसेच फ्लिपकार्टवरूनच याची विक्री केली जाईल. तसेच हा आगामी मोटोरोला फोन डार्क ऑरेंज, ग्रीन, ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध होईल. या स्मार्टफोनचे वजन 178.8 ग्राम आणि जाडी 7.99mm असेल.
Moto G04s चे स्पेसिफिकेशन
Moto G04s मध्ये 6.6 इंचाचा पंच होल डिस्प्ले मिळेल ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल आणि याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात येईल. अग्नी फोनमध्ये UniSoC T606 चिपसेटचा वापर केला जाईल, जोडीला Mali G57 जीपीयू दिला जाईल.
लिस्टिंगनुसार आगामी मोटो जी04एसमध्ये 50MP AI में कॅमेरा असेल. ज्यात पोट्रेट मोड आणि ऑटो नाइट व्हिजन असे फीचर्स मिळतील. Moto G04 मात्र 16MP चा मेन कॅमेरा होता. जुन्या सेल्फी कॅमेऱ्याची माहिती मात्र मिळाली नाही.
आगामी Moto G04s मध्ये 4GB रॅमसह 64GB स्टोरेज मिळेल. तसेच यातील रॅम बूस्ट फिचरच्या मदतीनं 8GB पर्यंत रॅम वाढवता येईल. हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल आणि यात डॉल्बी अॅटमॉस आणि मोटो जेस्चर सपोर्ट देण्यात येईल.
Moto G04 प्रमाणे आगामी Moto G04s मध्ये देखील 5,000mAh बॅटरी देण्यात येईल. ही बॅटरी 102 तासांपर्यंत म्युजिक प्लेबॅक आणि 20 तास व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. परंतु कंपनीनं कोणत्याही फास्ट चार्जिंगचा उल्लेख मात्र या लिस्टिंगमध्ये केला नाही.
अलीकडेच आलेल्या Moto G04 मधील अनेक फीचर्स Moto G04s मध्ये पाहायला मिळतील. फक्त नवीन फोनमध्ये एक चांगला कॅमेरा पाहायला मिळेल. तसेच याची किंमत देखील जास्त असू शकते. लाँचच्या वेळी Moto G04 ची किंमत 7,999 रुपये होती परंतु आता हा फोन 6,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. Moto G04s ची किंमत यापेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.