Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुन व शासनाची फसवनुक करणार्यांवर गुन्हे दाखल…
नागपूर (शहर प्रतिनिधी) – आममुखत्यार पत्राचा गैरवापर करणाऱ्या आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्याच्याकडून गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी संदीप देवगडे, रा. पांढुर्णा, जि.नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे वाठोडा, नागपूर शहर येथे अप क्र.२९५/२०२४ कलम ४०६,४२०,४६५,४६७,४६८,४७१,आणि ३४ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मध्ये पोलिसांनी आरोपी १) मोहम्मद रफिक वल्द शेख अब्दुला, रा.वर्धमान नगर पो.स्टे. नंदनवन, नागपूर, २) इकबाल रशीद दिवाण, रा. न्यु. शुकवारी, महाल नागपुर, ३) लिलाधर ज्ञानेश्वर मेंढेकर, रा. म्हाळगी नगर नागपुर व ४) दुय्यम निबंधक अ.रा. भिवगडे, दुय्यम निबंधक कार्यालय कामठी, नागपूर आदींवर कारवाई केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांनी त्यांचेकडील जमीन संबंधी गैर अर्जदार मोहम्मद रफिक वल्द शेख अब्दुला यांचेसोबत केलेल्या आममुखत्यार पत्राचा दुरूपयोग करून फिर्यादी संदीप देवगडे यांचे मालकीची जमीन हडपण्याचे उददेशाने सदर आममुख्त्यार पत्रामध्ये खाडाखोड करून शासनाची दिशाभुल करुन आममुख्त्यार पत्रामध्ये नमूद केलेल्या चर्तुसिमेतील जागेव्यतिरीक्त दुस-याच ०२ एकर जमीनीचे विक्रीपत्र हे तत्कालीन दुय्यम निबंधक भिवगडे यांचेशी संगनमत करुन सदर दस्तामध्ये खाडाखोड असतांना सुध्दा त्याबाबत जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता तत्कालीन दुय्यम निबंधक भिवगडे यांनी दुय्यम निबंधक कार्यालय कामठी येथे दस्त क्र.६५१३/२०२३ अन्वये आरोपी क्र.१ मोहम्मद रफीक वल्द शेख अब्दुल्ला यांचे नावावर करण्यास मदत केली.
त्यानंतर आरोपी मोहम्मद रफीक वल्द शेख अब्दुल्ला याने आममुख्त्यारपत्रा मध्ये जमीनीचा कोणताही दर ठरलेला नसताना यातील फिर्यादी संदीप देवगडे यांना कोणतीही माहिती नसताना फिर्यादी संदीप देवगडे यांचे बँक खात्यामध्ये एकूण २५ लाख रूपये वळते केले, सदर गुन्हयातील आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी व शासनाचा विश्वासघात करून फिर्यादीची ०२ एकर जमीन किं अंदाजे १,२३,९७,०००/- रु. ची फसवणुक केल्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडील सपोनि सचिन तडाखे व तपास पथक यांनी आरोपी मोहम्मद रफीक वल्द शेख अब्दुल्ला यास सदर गुन्हयात अटक केली असुन पुढील तपास सुरु आह्
अशा प्रकारे सदर कारवाई ही पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)संजय पाटील,पोलिस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन तडाखे हे करीत आहेत