Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तिरुअनंतपुरम: आता आपण कुठेही जाताना अगदी सर्रासपणे गुगल मॅप्सचा वापर करतो. गुगल मॅप्स आपल्याला योग्य वाट दाखवतो. पण केरळ फिरण्यास गेलेल्या पर्यटकांना गुगल मॅप्सचा वापर चांगलाच महागात पडला. पर्यटकांची कार पाण्यात बुडाली. त्यामुळे वाट शोधणाऱ्या पर्यटकांचा ग्रुप अडचणीत सापडला.
हैदराबादमधील काही जण दक्षिण केरळमधील कुरुप्पनतराला फिरायला गेले होते. गुगल मॅप्सच्या मदतीनं त्यांचा प्रवास सुरु होता. शुक्रवारच्या रात्री ४ जण एका कारनं प्रवास करत होते. त्यांच्यात एक महिला होती. पर्यटक अलप्पुझाला जात होते. मुसळधार पाऊस सुरु होता. पर्यटक ज्या भागातून प्रवास करत होते, त्या भागात बरंच पाणी साचलं होतं. पर्यटकांना आसपासच्या परिसराची फारशी माहिती नव्हती. पण तरीही त्यांनी गुगल मॅप्सवर पूर्ण विश्वास वाटला. याच आंधळ्या विश्वासामुळे ते अडचणीत आले. गुगल मॅप्सवर पूर्णपणे विसंबून राहण्याची चूक त्यांना भोवली.
गुगल मॅप्सकडून मिळत असलेल्या सूचनांच्या आधारे पर्यटकांचा प्रवास सुरु होता. कार रस्त्यावर चालताना अचानक नदीत कोसळली. कारमध्ये असलेल्या चारही जणांना पोलिसांनी आणि स्थानिकांनी वाचवलं. पण त्यांची कार पाण्यात बुडाली. कार बाहेर काढण्याचं काम सुरु असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जवळच असलेल्या नदीला पूर आला असल्यानं ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गुगल मॅप्सचा वापर करताना वाहन बुडाल्याची ही केरळमधील पहिलीच घटना नाहीए. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन डॉक्टरांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. ते गुगल मॅप्सच्या आधारे वाहन चालवत होते. त्यांची कार एका नदीत पडली. वेळीच मदत न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. कार नदीत पडल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. मान्सून काळात तंत्रज्ञानाचा वापर करताना लोकांनी सावध राहायला हवं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.