Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Cyclone Remal: रेमल चक्रीवादळ आज बंगालच्या किनाऱ्यावर धडकणार; ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा

10

वृत्तसंस्था, कोलकता : बंगालच्या उपसागरातील तीव्र चक्रीवादळ आज (रविवारी) रात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे वादळ किनाऱ्यावर धडकताना वाऱ्याचा वेग ताशी ११० ते १२० किलोमीटर असेल, तो ताशी १३५ किलोमीटरपर्यंत वाढू शकेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवर रविवार आणि सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळामुळे समुद्रात दीड मीटर उंचीच्या लाटा उसळतील. या काळाच मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांत ‘रेड अॅलर्ट’ देण्यात आला आहे. यंदा मान्सूनपूर्व काळातील बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे पहिलेच चक्रीवादळ आहे. याखेरीज कोलकाता, हावडा, नादिया आणि पू्र्व मेदिनीपूर जिल्ह्यांना ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे.

आठ जिल्ह्यांत पावसाचा इशारा

आगरतळा : राज्यातील आठ जिल्ह्यांत येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामन विभागाने वर्तवला आहे. या काळात मुसळधार पावसासह जोरदार वारे आणि विजा चमकण्याचाही अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून हा पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
Code Of Conduct : मान्सूनपूर्व कामांसाठी आचारसंहिता शिथिल? राज्याला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता
केरळमध्ये जनजीवन विस्कळित

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अलप्पुळा जिल्ह्यातील कुट्टनाड येथे घरांमध्ये, शाळांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. रेल्वे वाहतूक विलंबाने सुरू आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.