Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

MP Anar Murder Case: बांगलादेश खासदारहत्येप्रकरणी मोठी अपडेट; सरकार घेणार इंटरपोलची मदत, सूत्रधाराला…

8

वृत्तसंस्था, ढाका
बांगलादेशचे सत्ताधारी पक्षाचे खासदार अन्वरूल आझिम अनार यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला मायदेशी आणण्यासाठी बांगलादेशचे सरकार इंटरपोलची मदत घेणार आहे. गेल्या आठवड्यात अनार यांची कोलकात्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती.

ढाका महानगर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख हरुन ओर रशिद यांनी रविवारी हझरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना याबाबत सांगितले. खासदारांच्या हत्येच्या तपासासाठी कोलकात्याला प्रयाण करण्यापूर्वी ते बोलत होते. ‘अनार यांच्या हत्येचा सूत्रधार अख्तारुझ्झामन शाहीन याला मायदेशी आणण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली जाईल. या बाबतचा अर्ज खासदाराची बालपणीची मैत्रीण शाहीन या पोलिस महानिरीक्षकांमार्फत सादर करणार आहेत,’ असे राहून यांनी यावेळी सांगितले. खासदारांच्या हत्येचा तपास करण्यासाठी गुप्तहेर शाखेच्या तीन अधिकाऱ्यांचे पथक रविवारी ढाका येथून कोलकाता येथे पोहोचले. हे पथक प्रथम कोलकात्यातील घटनास्थळी जाईल आणि त्यानंतर या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या जिहादची चौकशी करेल, असेही त्यांनी सांगितले.
‘रेमल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली; वादळापूर्वी रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका; विमानतळावरील उड्डाणे रद्द

तीनवेळा खासदार असलेले अनार हे कोलकाता येथे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी १२ मे रोजी ढाक्यातून निघाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते कोलकात्यातून बेपत्ता झाले. कोलकात्यात राहारे अनार यांचे निकटवर्तीय गोपाल बिस्वास यांनी ते बेपत्ता असल्य़ाची तक्रार १८ मे रोजी स्थानिक पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अनार यांची गळा आवळून हत्या करण्यात आली आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि विविध ठिकाणी ते टाकून देण्यात आले. त्यांच्या अवशेषांचा अजूनही शोध सुरू आहे.

खासदाराच्या हत्येच्या कथित सहभागावरून तीन संशयितांना बांगलादेशच्या न्यायालयाने शुक्रवारी आठ दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, पश्चिम बंगालच्या पोलिसांनी मुंबईत कसायाचे काम करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला उत्तर २४ परगणा जिल्ह्यातून अटक केल्याचा दावा केला आहे.

पश्चिम बंगालच्या सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी या हत्येमागे सोन्याच्या तस्करीचा संशय व्यक्त केला होता. अनार आणि त्यांचा अमेरिकेतील मित्र व व्यावसायिक भागीदार यांच्यात सोन्याच्या तस्करीवरून झालेली कथित वाद हे या गुन्ह्याचे कारण असू शकते, असा तपासकर्त्यांचा दावा आहे. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी यापूर्वी अनारच्या हत्येतील प्रमुख संशयित म्हणून एका व्यावसायिकाचे नाव घेतले होते. तसेच, या गुन्ह्यासंदर्भात त्याच्यावर खटला चालवण्याकरिता भारत आणि अमेरिकेसोबत बांगलादेशचे गृहमंत्रालयही काम करत आहे, असेही त्यांनी नमूद केले होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.