Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ८७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण २ हजार ७६३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ९० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या ९० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ९१ हजार ६६२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ड्रग पार्टीवरील कारवाईतील मनीष भानुशाली, के. पी. गोसावी कोण आहेत?
राज्यात अशी आहे सक्रिय रुग्णांची स्थिती
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार १५९ इतकी आहे. काल ही संख्या ३३ हजार ६३७ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ८ हजार ९२९ इतका खाली आला आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ४ हजार ०१४ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार १८६ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ०५५ वर आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार १४९ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ९४२ आहे.
क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानची अटक बोगस? भाजपचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांच्या वेषात; ‘या’ मंत्र्याचा गौप्यस्फोट
मुंबईत उपचार घेत आहेत ५,४५१ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ४५१ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६४७ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६५७, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८१० इतकी खाली आली आहे.
नंदुरबार, बुलडाणा, भंडारा आणि गोंदियात प्रत्येकी १ सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४७८, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९७ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १०२ वर आली आहे. तर नंदुरबार, बुलडाणा, भंडारा आणि गोंदियात या जिल्ह्यांमध्ये राज्यातील सर्वात कमी म्हणजेच १ सक्रिय रुग्ण आहे.
वाचा:‘एनसीबीचं पुढचं टार्गेट अभिनेता शाहरूख खान’; ‘या’ मंत्र्यांचा सनसनाटी दावा
२,३९,७६० व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९६ लाख १९ हजार ६३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६७ हजार ७९१ (११.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ३९ हजार ७६० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ४१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.