Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सॅमसंग नव्हे तर ही कंपनी घेऊन येत आहे 180MP कॅमेरा असलेला फोन; वॉटरप्रूफ बिल्डसह मिळेल मोठी बॅटरी

9

Honor Magic 6 सीरीज यावर्षी जानेवारी मध्ये ग्लोबली सादर करण्यात आली होती. या लाइनअपमध्ये Honor Magic 6 आणि Honor Magic 6 Pro सादर करण्यात आले होते. यात Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर, हँडसेटमध्ये LTPO OLED डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असे फीचर्स मिळतात. आता बातमी आली आहे की हे दोन्ही डिवाइस भारतीय बाजारात येणार आहेत. ही माहिती टिप्सटर पारस गुगलानीने दिली आहे.

टेक टिप्सटर पारसचा दावा आहे की Honor Magic 6 आधी लाँच केला जाईल. तसेच, लाइनअपचा टॉप मॉडेल म्हणजे Honor Magic 6 Pro जुलै मध्ये बाजारात येईल. हे दोन्ही भारतात आल्यामुळे शाओमी, विवो आणि ओप्पो सारख्या ब्रँड्सना चांगली टक्कर मिळेल. याआधी मार्चमध्ये कंपनीचे सीईओ Madhav Seth यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर स्मार्टफोनची डिजाइन टीज केली होती.
फक्त 45 रुपये देऊन खरेदी करता येईल ‘हा’ फोन; अशी आहे Vivo ची ऑफर

Honor Magic 6 सीरीजमध्ये आहे तरी

ऑनर मॅजिक 6 लाइनअप Android 14 आधारित MagicOS 8.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालते. या सीरीजच्या फोन्समध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल प्रोसेसर Snapdragon 8 Gen 3 देण्यात आला आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले मिळतो, तर टॉपमध्ये 6.8 इंचाची स्क्रीन मिळते. यांच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.

Magic 6 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा मिळतो, त्याचबरोबर 50MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि OIS सपोर्टसह 180MP ची पेरिस्कोप अल्ट्रा टेलीफोटो लेन्स आहे. स्टँडर्ड व्हर्जनमध्ये 32MP ची टेलीफोटो लेन्स मिळते. तर फ्रंटला दोन्ही फोन्समध्ये 50MP + TOF सेन्सर देण्यात आला आहे, जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगच्या कामी येतो.

ऑनर मॅजिक 6 मध्ये 5,450mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, तर प्रो मॉडेलमध्ये 5,600mAh ची बॅटरी मिळते. हे दोन्ही IP68 रेटिंगसह बाजारात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी मोबाइल फोन्समध्ये ड्युअल सिम, 5G, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी टाईप-सी पोर्ट आणि ऑडियो जॅक देण्यात आला आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर पण मिळतो.

Honor Magic 6 सीरीजची संभाव्य किंमत

ऑनरनं आतापर्यंत अधिकृतपणे ऑनर मॅजिक 6 सीरीजच्या लाँच किंवा किंमतीची जास्त माहिती दिली नाही परंतु अलीकडेच समोर आलेल्या लीक्स व रिपोर्ट्सनुसार सीरीजची किंमत 65 हजारांपासून सुरु होऊ शकते. आता प्रीमियम सेगमेंटमध्ये ही कंपनी किती तग धरू शकते ते पाहावं लागेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.