Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोर्ट मॅरेजनंतर नवं आयुष्य सुरु; सेलिब्रेशनसाठी गेम झोनमध्ये, तिथेच कपलच्या आयुष्याचा शेवट

9

राजकोट: गुजरातच्या राजकोटमध्ये असलेल्या टिआरपी गेमिंग झोनला शनिवारी संध्याकाळी आग लागली. या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलांची संख्यादेखील अधिक आहे. उन्हाळ्याची सुट्टी सुरु असल्यानं लहान मुलांनी गेमिंग झोनमध्ये गर्दी केली होती. या दुर्घटनेत एका नवविवाहित दाम्पत्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचादेखील मृत्यू झाला.

अक्षय ढोलकिया आणि त्यांची पत्नी ख्याती स्वालिवी यांचा गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत मृत्यू झाला. दोघांचा विवाह नुकताच झाला होता. कॅनडामध्ये शिक्षण घेत असलेला अक्षय नुकताच ख्यातीसोबत लग्न बंधनात अडकला. दोघांनी कोर्टात लग्न केलं होतं. याच लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी दोघे राजकोटच्या टिआरपी गेम झोनमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत ख्याती यांची बहीण हरितादेखील होती. या तिघांचाही आगीत मृत्यू झाला.
Rajkot Game Zone Fire: ‘मृत्यूच्या अटीं’वर ग्राहकांच्या सह्या; २७ जणांचा जीव घेणाऱ्या गेमिंग झोनचा फॉर्म समोर
अक्षय आणि ख्याती यांच्या कुटुंबियांनी येत्या डिसेंबरमध्ये त्यांच्या विधीवत लग्नाची तयारी केली होती. मोठ्या धुमधडाक्यात त्यांचं लग्न संपन्न होणार होतं. मात्र नवदाम्पत्याचा त्याआधीच करुण अंत झाला. त्यामुळे दोन्ही कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अक्षयचे आई, वडील अमेरिकेत वास्तव्यास असतात. घटनेबद्दल कळताच ते राजकोटला येण्यास निघाले. आगीत होरपळल्यानं मृतांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अक्षयच्या पालकांकडे डीएनएचे नमुने मागण्यात आले आहेत.
Pune Car Accident: ‘ती’ कार गिफ्ट दिलेली, आजोबांनी फोटो WhatsApp ग्रुपवर टाकलेला; मित्रानं गुपितं फोडली
राजकोटमधील टिआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ४ जणांचं वय १२ वर्षांपेक्षा कमी आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी झोनच्या मालकाला आणि व्यवस्थापकाला अटक केली आहे. राज्य सरकारनं घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदिप धनखर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुर्घटनेबद्दल संशय व्यक्त केला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.