Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कुलिंग सोबतच हवा शुद्ध असणेही गरजेचे, घरात लावा Dysonचे एयर प्युरिफायर, उन्हाळ्यात असे ठरते फायदेशीर
डायसन ग्लोबल कनेक्टेड डेटाच्या अहवालानुसार, भारतात निम्म्यापेक्षा जास्त वर्षात पीएमची पातळी सरासरी २.५ पेक्षा जास्त नोंदविण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या गाईडलाइन्सपेक्षा जी खूप जास्त आहे. डायसन कंपनीतील डिजाईन इंजिनिअर अक्षय कृष्णा यांनी कडक उष्णतेत घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी आणि घरातील वातावरण निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
घरातील हवेत फॉर्मल्डिहाइडचा प्रभाव
फॉर्मल्डिहाइड हा एक रंग नसलेला गॅस आहे. घरातील विविध वस्तूंमधून तो बाहेर पडत राहतो. प्लायवुड आणि फायबरबोर्ड, इन्सुलेटिंग मटेरियल, पेंट, वॉलपेपर, वार्निश आणि घरगुती साफसफाईचे प्रॉडक्ट्स फॉर्मल्डिहाइड हा गॅस सोडतात. हा गॅस बहुतांश घरांमध्ये असतो, परंतु कडक उन्हाळ्यात हा हानिकारक गॅस बाहेर पडण्याचे प्रमाण खूप जास्त असते.
त्यामुळे, हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून फॉर्मल्डिहाइड सारख्या विषारी गॅसचे एक्सपोजर टाळता येईल.
Dyson Purifier Cool Formaldehyde TP09 केवळ त्याच्या इंटेलिजंट सॉलिड स्टेट सेन्सरने हवेतील फॉर्मल्डिहाइड शोधत नाही तर डायसनच्या सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक ऑक्सिडायझेशन (SCO) फिल्टरने तो बाहेर काढून टाकते. शिवाय त्याचा इंटेलिजंट अल्गोरिदम अतिशय अचूकतेसह फॉर्मल्डिहाइड गॅस ओळखतो.
अनेकदा घरातील हवा श्वास घेण्यासाठी सुरक्षित नसते
काहीवेळा आपल्या घरातील हवा श्वास घेण्यास सुरक्षित नसते. आपल्या घरात असलेल्या गोष्टींमुळे हे होते, जसे की स्वयंपाक करणे किंवा साफ करणे, तसेच बाहेरून येणाऱ्या गोष्टी जसे की, धुवा पॉलेन आणि मोल्ड स्पोर याच्यातून हवा येते व आपल्या घराच्या आत असलेली आणि बाहेरची हवा एकत्र मिसळते आणि हे खराब हवेचे मिश्रण तयार होते जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.