Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त निघाला, राष्ट्रपती भवनात लगबग, ५ जूनलाही सोहळा शक्य?

11

नवी दिल्ली : १८ वी लोकसभा निवडणूक जिंकून देशाच्या सत्तेवर येणाऱ्या नव्या सरकारचा शपथविधी हा लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर दुसऱ्या दिवसापासून ९ जूनपर्यंत कधीही होण्याची शक्यता आहे. याची चाहूल राष्ट्रपती भवनाने सुरू केलेल्या तयारीमुळे मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीचे सातवा व अखेरचा टप्पा या शनिवारी असून ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीचे मतदानही बाकी आहे. राष्ट्रपती भवनाने मात्र नव्या सरकारच्या शपथविधीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

येत्या ५ ते ९ जून या काळात राष्ट्रपती भवन अभ्यागतांसाठी पूर्ण बंद राहील, असे जाहीर करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारचा पहिला शपथविधी २०१४ मध्ये व दुसरा शपथविधी २०१९ मध्ये याच राष्ट्रपती भवनाच्या विशाल प्रांगणात पार पडला होता. त्यावेळी राष्ट्रपतिपदी प्रणव मुखर्जी व रामनाथ कोविंद होते.

दिल्लीत मे अखेर व जूनमध्ये कडक उन्हाळा असतो. त्यामुळे प्रस्तावित शपथविधीची वेळ सायंकाळी साडेपाचनंतरची ठेवणे किंवा या मोठ्या मैदानात मांडव टाकणे हे दोन पर्याय राष्ट्रपती भवनाच्या सचिवालयासमोर आहेत. मात्र, ५ ते ९ जून याच काळात नवे सरकार आपल्या शपथविधीसाठी निवडण्याची शक्यता जास्त आहे.
Chhagan Bhujbal : विधानसभेला ८०-९० जागांचा भाजपचा शब्द, हक्काचा वाटा हवा, पुन्हा खटपट नको, भुजबळांची दादांना आठवण

…असे आहे राष्ट्रपती भवन

ब्रिटिश वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांची निर्मिती असलेले राष्ट्रपती भवन संकुल रायसीना टेकडी भागातील ३३० एकरांवर वसले आहे. त्यातील ५ एकर परिसरात एच-आकाराची इमारत हे मुख्य राष्ट्रपती भवन आहे. यात ३४० खोल्या आहेत. ही देखणी इमारत पाहण्यासाठी देशविदेशातून लाखो पर्यटक येत असतात. याच्या प्रांगणात दर शनिवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत होणारा ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा पाहण्यासाठीची गर्दीही गेल्या काही वर्षांत वाढली आहे.
One Nation One Election : पुढील कार्यकाळात एक देश एक निवडणुकीची अंमलबजावणी, अमित शहांची घोषणाRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

– यापूर्वी बुधवार ते रविवार सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत लोक राष्ट्रपती भवनाला पाच वेळा भेट देऊ शकत होते
– मोदी सरकार व मागच्या वर्षी राष्ट्रपतीपदी निवड झाल्यावर स्वतः द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन पर्यटक व पाहुण्यांसाठी खुले असण्याचे दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला
– त्यानुसार मागच्या वर्षीच्या जूनपासून राष्ट्रपती भवन आता रविवारसह आठवड्यातील ६ दिवस सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुले असते
– याशिवाय लोकांना आता आणखी एक तास या परिसरात फिरता येते. मात्र सार्वजनिक आणि राजपत्रित सुट्यांच्या दिवशी येथे पाहुण्यांना प्रवेश नसतो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.