Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पंचायत सीझन 3 पाहा मोफत, वेगळे पैसे खर्च न करता असे मिळेल Amazon प्राइमचे सबस्क्रिप्शन

9

Amazon Primeची बहुप्रतिक्षित वेब सीरीज पंचायत सीझन 3 रिलीज झाली आहे. फुलेरा गावातील रंजक घटनांची मजा घेण्यासाठी तुम्हाला Amazon Primeची मेंबरशिप घेणे आवश्यक असेल. पण अशा परिस्थितीत तुम्ही अगदी मोफत ही सिरीज बघू शकता कसे ते जाणून घेऊया

आज आपण अशा रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये Amazon Primeचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. या यादीत Jio, Airtel आणि Vi चे प्लॅन्स समाविष्ट आहेत.

Jioच्या या प्लॅन्सह मिळेल फ्रि सबस्क्रिप्शन

Jio असे तीन प्लॅन्स ऑफर करते, ज्यासह तुम्हाला Amazon Prime चे सबस्क्रिप्शन मिळते. या यादीमध्ये 857 रुपये, 1198 रुपयांचे प्लॅन समाविष्ट आहेत.

Jio 857 रुपयांचा प्रीपेड प्लॅन – या प्लॅनसह तुम्हाला 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा म्हणजेच सुमारे 168जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दररोज 100 SMS मिळतात. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्राइम व्हिडिओ मोबाईल व्हर्जनचे 84 दिवसांचे सबस्क्रिप्शन मिळेल.

1198 रुपयांचा प्रीपेड प्लॅन – 1198 रुपयांच्या या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजे एकूण 168GB हाय-स्पीड डेटा यामध्ये उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दररोज 100 SMS मिळतात. यामध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल व्हर्जन, डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल (3 महिन्यांसाठी), Sony Liv, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, DocuBay, EPIC On, Sun NXT, Hoichoi, Chaupal, Planet Marathi, Kancha यांचा समावेश आहे.

Airtel फॅमिली प्लॅन

599 रुपयांचा फॅमिली प्लॅन – एअरटेलच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 SMS मिळतात . याशिवाय, रिचार्जमध्ये, प्रायमरी सिम धारकासाठी 75 जीबी डेटा ऑफर केला जातो तर ॲड-ऑन कनेक्शनसाठी 30 जीबी डेटा ऑफर केला जातो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये Amazon Prime Video 6 महिन्यांसाठी, Disney + Hotstar आणि Airtel Xstream Play यांची OTT मेंबरशिप 1 वर्षासाठी उपलब्ध आहेत.

999 रुपयांचा फॅमिली प्लॅन – Airtelच्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि 100 SMS दररोज ऑफर करण्यात येतात. ग्राहकांना 6 महिन्यांसाठी Amazon Prime Video, 1 वर्षासाठी Disney+ Hotstar आणि Airtel Xstream Play यांची मोफत OTT मेंबरशिप दिली जाते.

VIचा 3199 रुपयांचा प्लॅन

Vi च्या 3199 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल, दररोज 100 SMS आणि एक वर्षाचे Amazon Prime Video सबस्क्रिप्शन दिले जाते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.