Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ओझर येथील IPL जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

9


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

ओझर परिसरात IPL मॅचवर सट्टा लावणारे इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,पाच आरोपी ताब्यात…

नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
जिल्हयातील अवैध धद्यांचे समुळ उच्चाटन होण्यासाठी नाशिक ग्रामीण  पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये कारवाई सुरू आहे.त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या आय. पी. एल. सामन्यांदरम्यान लाईव्ह मॅच पाहुन लोकांकडुन पैशांची बोली लावुन सट्टा खेळणारे व खेळविणारे इसमांवर कारवाई करणेबाबत
ओदशित करण्यात आले होते.

त्याअनुषंगाने दि (२४) मे रोजी आय. पी. एल. मालिकेत सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स् या संघांचा क्रिकेट सामना सुरू होता, दरम्यान ओझर दहावा मैल परिसरात एका हॉटेलमध्ये सदर सामन्यावर बेटींग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी ओझर, दहावा मैल परिसरात हॉटेल फुडहब मधील रूममध्ये छापा टाकला. सदर ठिकाणी इसम  १) भव्य चैतन्य दवे, वय २५, रा. दहिसर, मुंबई, २) जतीन नवीन सहा, वय ४१, रा. धोबी अली, चरई, ठाणे पश्चिम, ता. जि. ठाणे यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेले
इसम हे ऑनलाईन पध्दतीने त्यांचे इतर साथीदारांसह वरील आय. पी. एल. सामन्यावर त्यांचे ताब्यातील मोबाईलव्दारे लोकांकडुन पैसे  घेवुन बेकायदेशीररित्या सट्टा खेळतांना व खेळवितांना मिळुन आले आहे.

तसेच सदर इसमांनी फुडहब हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी संगनमत करून त्यांचे बनावट नावाने आधारकार्ड बनवुन खरे नाव असल्याचे भासवून, बनावट सिमकार्डचा वापर करून आय.पी.एल. सामन्यांवर बेटींग लावण्यासाठी वेगवेगळया आय. डी. व्दारे इतर बुकींसोबत बेकायदेशीररित्या ऑनलाईन जुगार, सट्टा लावून
शासनाची व मोबाईल कपंन्यांची फसवणुक केली म्हणून त्यांचेविरूध्द ओझर पोलिस ठाणे गुरनं १०७/२०२४ भादवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ (अ) व ५, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर छाप्यात ताब्यात
घेतलेले इसमांचे कब्जातुन विविध कंपन्यांचे ०४ मोबाईल स्मार्टफोन व आय. पी. एल. बेटींगसाठी लावण्यात आलेले अंक आकडे लिहिलेली वही, कॅल्क्युलेटर असा २२,१६० /- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांचे सात दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

यातील आरोपीतांकडे वरील गुन्हयाचे तपासात अधिक चौकशी केली असता, त्यांचे मुंबई येथील इतर साथीदार नामे ३) प्रथम राजेश सुचक, वय २३, रा. मुलुंड पश्चिम, मुंबई, ४) विनोद सुभाषचंद्र गुप्ता, वय ५०, रा. विक्रोळी पुर्व, मुंबई, ५) रमेश श्रीगोपाळ जयस्वाल, वय ५४, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई, ६) विशाल किर्तीकुमार मडीयाँ. वय ४९, रा. मुलुंड पश्चिम, मुंबई, ७) निखिल विरचंद विसरीया, वय ४६, रा. मुलुंड पश्चिम, मुंबई यांना देखील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथक करीत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक,नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने अपर पोलिस अधीक्षक,नाशिक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनानुसार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  राजु सुर्वे, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि नाना शिरोळे, सफौ शिवाजी ठोंबरे, पोहवा किशोर खराटे, मेघराज जाधव, उदय पाठक, नापोशि
हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गिरीष बागुल, नितीन डावखर, मनोज सानप यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.