Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
कौटूंबिक वादातुन जावयावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना छ. संभाजीनगर येथील बिडकीन येथुन २४ तासाचे आत अटक, दारव्हा पोलिसांची कारवाई…
दारव्हा(यवतमाळ)प्रतिनिधी – दि.(२७) मे रोजी या खुनी हल्ल्यातील विनोद चा भाऊ प्रमोद दिनेश ठाकरे याने पोलिस स्टेशन दारव्हा येथे तक्रार दिली की त्याचा भाऊ विनोद यांचेवर त्याचे मेहुन्यांनी धारदार शस्त्राने वार करुन त्यास गंभीर जखमी केले यावरुन पोलिस स्टेशन दारव्हा येथे त्याचे मेहुण्यांविरोधात अप. न. ३७६ / २०२४ भादवि ३०७,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,याकील जखमी विनोद निलकंठ वाळीजंकर वय ३६ वर्ष रा. मानकोपरा ता. दारव्हा ह.मु. अंधेरी मुंबई हा काही कामानिमित्य मुळ गावी मानकोपरा येथे आला होता त्याने त्याचे मेव्हणे व यातील आरोपी क्र १) किशोर दिपक काकडे वय ३४ वर्ष आरोपी क्र २) धनराज दिपक काकडे वय २९ वर्ष दोन्ही रा. बिडकिन जिल्हा संभाजीनगर यांना घर बांधणी साठी ५,००,०००/- रूपये उसनवार दिले होते आरोपी हे रक्कम परत करत नसल्याने यावरुन विनोद व त्याची पत्नी सौ. रेखा वाळींजकर यांच्यात वाद झाला सौ. रेखा हिने आपले भाऊ किशोर व धनराज यांना फोन करून मानकोपरा येथे बोलाविले तिचे भाऊ किशोर व धनराज हे दिनांक २६/०५/२०२४ रोजी मानकोपरा येथे आले असता
यातील आरोपी व यातील जखमी विनोदचे मेव्हने किशोर व धनराज यांनी विनोद यास बहिन सौ रेखा हिला त्रास का देतो असा जाब विनोद यास विचारल्याने त्यांचेत वाद होवुन हाणामारी झाली त्यात आरोपी किशोर व धनराज यांनी त्यांची कार क्र. एम.एच ०४ एच.एम. ३०४३ मधुन धारधार हत्यार काढुन विनोद वर जिवे ठार मारण्याचे उददेशाने हल्ला केला तो वार चुकविण्यासाठी विनोद हा मागे फिरला असता त्याचे पाठीवर धारधार हत्याराचा घाव बसल्याने तो गंभीर जख्मी झाला त्यास जिल्हा रूग्णालय यवतमाळ येथे दाखल केल्याने त्याचेवर उपचार सुरू आहेत. यावरुन विनोद याचा भाऊ यांचे तक्रारी वरुन किशोर व धनराज व विनोदची पत्नी पत्नी सौ. रेखा वाळींजकर यांचे विरूध्द अप. न. ३७६ / २०२४ भादवि कलम ३०७,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल केल्या नंतर आरोपी किशोर, धनराज व विनोदची पत्नी रेखा वाळींजकर आपल्या चार चाकी वाहणाने पळुन गेले होते
पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांचे आदेशावरून पोउपनि धनंजय रत्नपारखी यांचे पथक आरोपीचे शोध घेणे कामी रवाना करण्यात आले होते सायबर टिम चें मदतीने यातील आरोपी किशोर व धनराज यांना त्यांचे चारचाकी वाहना सह रात्रीच बिडकिन जिल्हा संभाजीनगर येथुन ताब्यात घेवुन पो.स्टे. दारव्हा येथे आणुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आली.व गुन्हयात वापरलेले चार चाकी वाहन देखील जप्त करण्यात आले आहे आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता मा.न्यायालयाने ३० तारखेपर्यत पोलिस कोठडी दिली आहे तसेच यातील महीला आरोपी रेखा वाळुंजकर ही आज पोलिस स्टेशन दारव्हा येथे हजर होणार असल्याचे कळले
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, सहा.पोलिस अधिक्षक दारव्हा चिलुमुला रजनिकांत यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विलास कुलकर्णी, पोउपनि धनंजय रत्नपारखी पोहवा महेद्र भुते, शिवाजी शेळके पोशि अमोल सोनोने यांनी पार पाडली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि शिवशंकर कायंदे पोशि पंकज राठोड हे करीत आहेत